महात्मा फुले यांच्या साहित्यात मानवजातीच्या विकासाची बीजे- प्रा. विजय लोनबले

35

महात्मा फुले यांच्या साहित्यात मानवजातीच्या विकासाची बीजे- प्रा. विजय लोनबले
मूल:- अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने मूल येथे सोशल डिस्टंसिंग चे पालन करून क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन सोहळा दिनांक 11 एप्रिल ला सायंकाळी ६ वाजता आयोजित करण्यात आला
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी ज्येष्ठ समाजसेविका अ. भा. महात्मा फुले समता परिषदेचे महिला जिल्हा कार्याध्यक्ष शशिकला गावतूरे ह्या लाभल्या. प्रमुख वक्ते म्हणून कर्मवीर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के. एच. कऱ्हाडे , सेवानिवृत्त केंद्रप्रमुख भैय्याजी ढोंगे हे होते.

कार्यक्रमा दरम्यान महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांचे पूजन, दीप प्रज्वलन व माल्यार्पण करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी उपस्थितांनी महात्मा फुले यांचे साहित्य वाचन केले व उपस्थितांना पुस्तके भेट देण्यात आली. प्रा.विजय लोनबले यांनी महात्मा फुल्यांनी मानवजातीसाठी केलेल्या कार्याला जगात तोड नसून महात्मा फुलेचे साहित्य वाचून स्वविकासा सोबतच समाजाचा विकास घडवावा असे विचार मांडले. याप्रसंगी शशिकला गावतुरे यांनी महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्यावर स्वरचित कविता सादर केली.,प्राचार्य डॉ. के. एच. कऱ्हाडे भैय्याजी ढोंगे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गंगाधर कुनघाडकर, समता परिषदेचे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख व सल्लागार युवराज चावरे यांनी महात्मा फुले यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला व उपस्थितांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी प्रा. गुलाब मोरे,प्रा. प्रभाकर धोटे, नामदेवराव गावतुरे, श्रावण लोनबले , सुरेश टिकले ,दलित जनबंधू , किरण खोब्रागडे, रामभाऊ चौधरी, प्रा.पुरूषोत्तम कुनघाडकर, युवक शहर अध्यक्ष राकेश मोहुर्ले, आकाश निकुरे, प्रतिक गुरनुले, महेश जेंगठे, अभिषेक ढोंगे, प्रा. धनंजय चुदरी , प्रा. सागर मासिरकर, दुशांत महाडोळे, मधुकर लेनगुरे, प्रशांत लोनबले, किरण चौधरी,सीमा लोनबले तसेच समता सैनिक व बालगोपाल उपस्थित होते.कार्यक्रमाचे संचालन रामभाऊ चौधरी यांनी केले.उपस्थितांचे आभार युवराज चावरे यांनी मानले.