विकेंड लॉकडाउनला मूल मध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद

61

मूल :- कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने जाहीर केलेल्या विकेंड लॉक डाउनला मूल मध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पोलीस कारवाईच्या भीतीने अनेकांनी घरीच बसने पसंत केल्याने मूल शहरामध्ये शुकशुकाट पाहावयास मिळाला. अत्यावश्यक सेवेत मोडणारे सर्व दुकाने चालू   इतर  आपापली दुकाने बंद ठेवून विकेंड लॉक डाउनला पाठिंबा दर्शवला त्यामुळे कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारने जाहीर केलेल्या लॉकडाऊनला मूल शहरात चांगला प्रतिसाद मिळाला.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने राज्यात थैमान घातले आहे. ही लाट रोखण्यासाठी शासनाने शुक्रवार रात्री 8 ते सोमवारी सकाळी 7 या दरम्यान कडक लॉक डाउन जाहीर केला आहे. या शिवाय अन्य दिवशीही अत्यावश्यक सेवा वगळता अन्य आस्थापने बंद ठेवण्याचे निर्देश शासनाकडून देण्यात आले आहेत.पोलिसांच्या या कारवाईमुळे शासनाच्या विकेंड लॉक डाउनला चांगला प्रतिसाद मिळाला आहे.शहरातील एकही दुकानदाराने आपले दुकान उघडले नव्हते.

ग्रामीण भागातून शहरात खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांनीही घरीच राहणे पसंत केले होते त्यामुळे नेहमी गजबजली बाजारपेठ, एसटी बस स्थानक,  आजूबाजूचा परिसर, गांधी चौक, प्रशासकीय भवन परिसर,पंचायत समिती

परीसर,तहसील कार्यालयातील आजूबाजूचा परीसर,गुजरी मधील परीसर या ठिकाणी निरव शांतता पहावयास मिळाली. ठिकठिकाणी पोलीस मात्र बंदोबस्तास असलेले पहावयास मिळत होते.