PM Kisan Scheme : तुमच्या खात्यात 2 हजार जमा झाले का? नसतील तर ‘अशी’ करा तक्रार

61

नवी दिल्ली 10 एप्रिल : पंतप्रधान किसान सन्मान निधीमधील (PM Kisan Samman Nidhi) आठव्या हप्त्याची 2000 रुपयांची रक्कम अनेक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पाठवण्यात येत आहे. सरकारच्या मार्फत देशातील शेतकऱ्यांना दरवर्षी 6000 रुपयांची आर्थिक मदत केली जाते. मात्र, एखाद्या शेतकऱ्याला या योजनेंतर्गत पैसे मिळाले नसतील, तर काळजीची काहीही गरज नाही. कारण, आता तुम्ही याची तक्रार केंद्रीय कृषी मंत्रालयाकडे करू शकता. केंद्राकडून सुरू करण्यात आलेली शेतकऱ्यांसाठीची ही सर्वात मोठी योजना आहे आणि या योजनेचा लाभ शेतकऱ्यांना व्हावा जेणेकरुन शेतकऱ्यांसमोरील संकटाचे ढग संपून जातील, असा सरकारचा उद्देश आहे.

2000 रुपये मिळवण्यासाठी इथे करा तक्रार –

सर्वात आधी आपल्याला आपल्या क्षेत्रातील लेखापाल आणि कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा लागेल आणि त्यांना त्याबद्दल माहिती द्यावी लागेल. जर हे लोक आपलं म्हणणं ऐकत नसतील, तर आपण त्यासंबंधित हेल्पलाइनवरदेखील कॉल करू शकता.

तुम्ही सोमवार ते शुक्रवारच्या मध्ये पीएम किसान हेल्प डेस्कच्या PM KISAN Help Desk) ई मेल (Email) pmkisan ict@gov.in वर संपर्क करू शकता. इथेही काहीच प्रतिसाद न मिळाल्यास आपण 011 23381092 (Direct HelpLine) या हेल्पलाइन नंबरवरही संपर्क करू शकता.

शेतकऱ्यांकडून अनेक तक्रारी –

मागील अनेक दिवसांपासून या योजनेबाबत तक्रारी येत आहेत. नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांनाही पैसे मिळत नसल्याचं अनेक तक्रारींमध्ये म्हटलं गेलं आहे. एकाच गावातील काही शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपये जमा जाले आहेत तर काही शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा झाली नाही.

काही लोकांच्या खात्यात पहिला हप्ता जमा झाला आहे मात्र दुसरा हप्ता नाही. अशा लोकांनी प्रथम त्यांच्या लेखापाल आणि कृषी अधिकाऱ्यांना विचारावे की त्यांचे नाव लाभार्थ्यांच्या यादीत आहे की नाही. जर ते असेल तर मग पैसे का आले नाहीत? ते त्यांना विचारा. आपणास उत्तर न मिळाल्यास योजनेच्या हेल्पलाईनशी संपर्क साधा. देशातील सर्व 14.5 कोटी शेतकर्‍यांना सरकार पैसे देऊ इच्छित आहे. जर शासनाचा हा हेतू पूर्ण करण्यात एखादा अधिकारी अडथळा ठरत असेल तर त्याची तक्रार करा.