संचारबंदीचे पालन करा : मुख्याधिकारी सिद्धार्थ मेश्राम

57

संचारबंदीचे पालन करा :मुख्याधिकारी सिद्धार्थ मेश्राम

‘घरी राहा- सुरक्षित राहा’

मूल : जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशानुसार  मूल  शहरात शुक्रवार रात्री ८ वाजेपासून शनिवार आणि रविवार या दोन दिवसांकरिता संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या दोन दिवसात शहर परिसरातील अत्यावश्यक सेवेत मोडणारे सर्व दुकाने चालू राहतील. मात्र सर्वसामान्य व्यक्तींना शहरात फिरता येणार नाही. विनाकारण फिरणाऱ्या व्यक्तींवर संचारबंदी कायद्यान्वये गुन्हे नोंद केले जातील. शुक्रवार रात्री ८ पासून शहरांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली असून लोकांनी अत्यावश्यक कारणाशिवाय बाहेर पडू नये, विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल. नागरिकांनी घरीच सुरक्षित रहाऱ्यांच्या सुचना  मूलनगरपालिका प्रशासनातर्फे देण्यात आल्या आहेत.

शुक्रवार रात्री 8 ते सोमवार सकाळी 7 वाजेपर्यंत संचारबंदी असल्याने कोणत्याही नागरीकांस वैध कारणांशिवाय फिरणेस बंदी असल्याने कोणतेही नागरीक फीरणार नाही याची दक्षता घ्यावी तसेच शनिवार व रविवारला सकाळी 7 ते रात्री 8 वाजेपर्यंत अत्यावश्यक सेवेत असणारे आस्थापना दुकाने सोडुन इतर दुकाने बंद राहातील. उद्यान व मैदाने शुक्रवारी रात्री ८ ते सोमवारी सकाळी ७ पर्यंत पुर्णत: बंद राहतील. हॉटेल व रेस्टॉरंट याद्वारे केवळ घरपोच सेवा देता येईल प्रत्यक्ष दुकानात एकही ग्राहक राहणार नाही. तसे आढळल्यास दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल.

ज्या आस्थापना सुरु आहेत त्यांचे मालक व कामगारांची दिनांक १०/४/२०२१ पर्यंत तपासणी करुन घेणे बंधनकारक राहील. सदर तपासणी १५ दिवस वैद्य राहील. तपासणी करुन मालक व कामगारांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याचे प्रमाणपत्र दुकानाचे दर्शनी भागात लावणे बंधनकारक राहील. अन्यथा प्रती व्यक्ती १००० रु दंड आकारण्यात येईल व आस्थापना विरुद्ध १०००० रुपये दंडाची आकारणी करण्यात येईल.

तरी शासनाच्या आदेशाची सर्वांनी अंमलबजावणी करुन सहकार्य करावे. अशी नगर परिषद मूल चे मुख्याधिकारी सिद्धार्थ मेश्राम यांनी दिली आहे.