नळधारकांनी पाण्याचा योग्य वापर करावा . मुख्याधिकारी सिद्धार्थ मेश्राम

25

नळधारकांनी पाण्याचा योग्य वापर करावा.    मुख्याधिकारी सिद्धार्थ मेश्राम

मूल :-
पाणी हे जीवन आहे.पाण्याविना सर्व जीवन व्यर्थ आहे.भविष्यात मानवाला पिण्याचे पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवू नये व निरंतर पाणीपुरवठा होत राहावा यासाठी मूल शहरातील नळधारकांनी पाण्याचा काटकसरीने नियोजन करून पाण्याचा योग्य वापर करावा असे आवाहन नगर परिषद मूल चे मुख्याधिकारी सिद्धार्थ मेश्राम यांनी केले आहे.
मूल शहराच्या सर्वांगीण विकासासाठी बल्लारपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार सुधीर मुनगंटीवार हे करोडो रुपयांचा निधी मंजूर करित आहेत.त्यांच्या मार्गदर्शनात नगराध्यक्षा प्रा.रत्नमाला भोयर,उपाध्यक्ष नंदकिशोर रणदिवे व सर्व नगरसेवक विकासात्मक कामे मोठ्या प्रमाणात करीत आहेत.
मूल शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी 24/7 ही 48 कोटींची योजना पूर्णत्वास येत आहे.ह्या योजनेद्वारे दिनांक 6 एप्रिल 2021 पासुन मुल शहरातील तहसिल टाकी व मोजेस
टाकीचे 24 तास पाणी पुरवठा करण्याबाबत कार्यवाही करण्यात येत आहे. त्यामुळे दिनांक 5 एप्रिल 2021 चे रात्रीपासुन वरील दोन्ही टाकीचा पाणी पुरवठा 24 तास सुरू करण्यात येत आहे. नागरीकांनी आवश्यक तो पाणी साठा
करून नळतोटी बंद करून ठेवावे, जेणे करून उंचावर राहणाऱ्या नागरीकांना पाणी पुरवठा सुरळीतपणे होईल.1 एप्रील 2021 पासुन
नळाचे मिटरचे रिडींगनुसार पाणी पट्टी वसुली करण्यात येणार आहे.तसेच कोणताही नळधारकाने आवश्यक तो पाणी पुरवठा
झाल्यानंतर नळ तोटी बंद न करता पाणी नालीत , संडासमध्येकिंवा ईतरत्र पाईप टाकुन ठेवु नये जर पाणी वाया जात असल्याचे निदर्शनास आल्यास त्यांचे नळ कनेक्शन तात्काळ बंद करण्यात येईल याची नळ धारकांनी नोंद घ्यावी. नागरिकांनी आपल्याकडील थकीत पाणी कर व गृहकर भरावे, नियमाचे योग्यरीत्या पालन करून कारवाई टाळावी घरगूती नळांना तोटी लावावे.नगरपरिषदेला विकास कामात सहकार्य करावे व पाण्याचा अपव्यय टाळावा असे आवाहन नगरपरिषद मूल चे मुख्याधिकारी सिद्धार्थ मेश्राम यांनी केले आहे.मूल शहराला निरंतर पाणी पुरवठा व्हावा म्हणून पाणीपुरवठा सभापती अनिल साखरकर , पाणीपुरवठा निरीक्षक विनोद येनूरकर व पाणीपुरवठा कर्मचारी सतत प्रयत्न करीत आहेत.