बेंबाळ येथे महात्मा गांधी गा्रमीण रोजगार हमी योजनेतंर्गत पांदन रस्त्या च्या कामाला सुरूवात

64

मौजा बेम्बाल ता. मुल येथे महात्मा गांधी रोजगार हमी योजना अंतर्गत पांदन रस्त्या च्या कामाचे भूमीपूजन करताना चंदू मारगोंवार
कोरोना काळात कामगारांना दिलासा
मूल:- तालुक्यातील बेंबाळ येथे महात्मा गांधी गा्रमीण रोजगार हमी योजनेतंर्गत
बेबाळ येथील पांदन रस्त्या च्या कामाला सुरूवात झालेली आहे.
मूल पंचायत समिती चे सभापती चंदू मारगोनवार यांच्या हस्ते भूमिपूजन करून कामाला सुरूवात करण्यात आली.
रोजगार हमी कामामुळे पांदन रस्त्या च्या सदर काम हे कोरोनाचे शासकीय नियम पाळून केले जात आहे. यात सर्व मजूर,नागरिक सामाजिक अंतर ठेवून काम करीत आहेत आणि स्वतःची   काळजी स्वत घेत असून रोजगारासाठी काम करीत आहेत.सध्या  मिनी लाॅकडाउुन सुरू असून सर्व कामकाज ठप्प झाले आहे आणि ग्रामीण क्षेत्रात मजुरांना काम नाही.रिकामे असल्यामुळे या कोरोनाच्या  अडचणीच्या काळात कामाला सुरूवात झाल्यामूळे मजुरांना काम मिळाले आहे.