बेंबाळ येथे कोरोना लसीकरण केंद्राचे उद्घाटन

77

बेंबाळ येथे कोरोना लसीकरण केंद्राचे उदघाटन

मूल :-चंद्रपूर जिल्ह्यात कोरोना विषाणूंचा फैलाव सर्वत्र मोठया प्रमाणात होत आहे. ह्या विषाणूची लागण लहान मुलांपासून म्हाताऱ्यांपर्यंत होत आहे. कोरोनाच्या महामारीमुळे जनता चांगलीच धास्तावली आहे. कोरोनापासून जनतेचा बचाव करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने जिल्हास्तरावर मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले जात आहेत. मूल तालुक्यातील बेंबाळ येथे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बेंबाळ येथे कोरोना लसीकरण केंद्राची निर्मिती करण्यात आली आहे.

या कोरोना लसीकरण केंद्राचे उदघाटन दिनांक 04 एप्रिल ला सकाळी 11 वाजता पंचायत समिती मूल चे सभापती चंदू मारगोनवार यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. त्यानंतर चंदू मारगोनवार यांना कोविड लसीचा पहिला डोझ देण्यात आला.दिनांक 04 एप्रिल व 05 एप्रिल या दोन दिवसात बेंबाळ परिसरातील 45 वर्षांवरील 310 नागरिकांना कोविड लस देण्यात आली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामपंचायत च्या सरपंच करुणा उराडे  ह्या होत्या.यावेळी उपसंरपच मुन्ना कोटगले तंटा मुक्त ग्राम समिती अध्यक्ष गुरूदास राऊत, वैद्यकीय अधिकारी डॉ. रोहन धोंगडे, डॉ. जतीन लेनगुरे गडीसुरला आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. रंगारी मॅडम,मारोती जिल्हेवार ,सुरेश जिल्हेवार , प्राथमिक आरोग्य केंद्राचे सर्व कर्मचारी व गावांतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.हे कोविड लसीकरण केंद्र मूल तालुका आपत्ती निवारण व व्यवस्थापन मोहिमेचे प्रमुख उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर,तहसीलदार डॉ.रविंद होळी व तालुका आरोग्य अधिकारी डॉ.सुमेध खोब्रागडे यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे .प्राथमिक आरोग्य केंद्र बेंबाळ अंतर्गत येत असलेल्या सर्व गावांतील 45 वर्षांवरील नागरिकांनी कोविड लसीकरण करून प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन प्राथमिक आरोग्य केंद्र बेंबाळ चे वैद्यकीय अधिकारी डॉ.रोहन धोंगडे व डॉ.जतीन लेनगुरे यांनी केले आहे.