मा.आ.श्री,सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या स्थानिक विकास निधीतून चांदापुर क्रासिंग स्मशानभूमी येथे बोरवेल ( हातपंप ) मंजुर

42
मा.आ.श्री,सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या स्थानिक विकास निधीतून चांदापुर क्रासिंग स्मशानभूमी येथे बोरवेल ( हातपंप ) मंजुर
पक्षीय मतभेद बाजूला सारत मुनगंटीवारांनी दिला मदतीचा हात
मूल : जनतेची सेवा आणि क्षेत्राचा विकास या ध्येयाने प्रेरीत होऊन राजकारण करणारे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी राजकीय मतभेद बाजुला ठेवून समस्येच्या पूर्ततेसाठी धावून आल्याची प्रचिती चांदापूरवासीयांनी अलीकडेच अनुभवली.
तालुक्यातील चांदापूर ग्राम पंचायतीच्या हद्दीमधून जाणाऱ्या मूल-चामोर्शी-खेडी-गोंडपिपरी हा चौरस्ता नेहमी प्रवाश्यांनी गजबजलेला. याठिकाणी दिवसेंदिवस प्रवाश्यांची गर्दी वाढत असल्याने अनेकांनी याठिकाणी खाण्याच्या वस्तु विक्रीचा व्यवसाय सुरू केला. परंतु, याठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने रोजगार करणाऱ्यांना दररोज घरून पाणी आणावे लागायचे. त्यामुळे याठिकाणी रोजगार करणारे पाण्याचा वापर ग्राहकांसाठीच काटकसरीने करीत असतात. गरजवंताला पाण्याची बाटल विकत घेऊनच याठिकाणी तहान भागवावी लागते. परंतु, पाण्यासाठी पैसे खर्च करण्याची ज्यांची लायकी नसेल त्या गरिबांना मात्र मार्गाच्या बाजूने गेलेल्या मोठ्या पाइपलाइनच्या व्हॉल्वमधून गळत असलेल्या पाण्यावर तहान भागवावी लागते. चांदापूर हद्दीतील या चौरस्त्याशिवाय चांदापूर ग्राम पंचायतीच्या स्मशानभूमीमध्येही पाण्याची समस्या वर्षानुवर्षे कायम आहे. अंत्यसंस्काराकरिता आवश्यक असलेली क्रियापूर्ण करण्यासाठी स्मशानभूमीत पाण्याची टंचाई असल्याने नागरिकांना घरून पाणी न्यावे लागायचे. अशी स्थिती होती. चांदापूर ग्राम पंचायत हद्दीतील या दोन्हीही ठिकाणी जाणवणारी पाण्याची समस्या सुटावी म्हणून अनेकांनी विविध ठिकाणी पाठपुरावा केला. परंतु समस्यांची पूर्तता होत नव्हती. क्षेत्राचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांचे कडेही प्रयत्न झाले परंतु स्थानिक राजकारणामुळे सदर समस्या सुधीर मुनगंटीवार यांच्यापर्यंत कधी पोहोचतच नव्हती. अलीकडेच झालेल्या ग्राम पंचायत निवडणुकीत चांदापूर ग्राम पंचायतीवर काँग्रेसचे वर्चस्व प्रस्थापित झाले. त्यामुळे काँग्रेसच्या वर्चस्वात असलेल्या ग्राम पंचायत हद्दीतील समस्यांची पूर्तता करण्यास क्षेत्राचे आ. सुधीर मुनगंटीवार सहकार्य करतील, असे अनेकांना वाटत नव्हते. तरीसुध्दा ग्राम पंचायतीचे नवनिर्वाचित उपसरपंच अशोक मार्गनवार यांनी सदर दोन्ही समस्याबाबत सुधीर मुनगंटीवार यांच्याशी पत्रव्यवहार केला. प्रत्यक्ष भेटून समस्येची भीषणता लक्षात आणून देत चौरस्ता आणि स्मशानभूमीत स्थानिक विकास निधीमधून बोअरवेल मंजूर करावे, अशी विनंती केली. समस्या गंभीर असल्याचे लक्षात येताच आ. सुधीर मुनगंटीवार यांनी चांदापूर हद्दीतील चौरस्ता आणि स्मशानभूमीमध्ये अशा दोन बोअरवेल खोदण्यासाठी स्थानिक विकास निधी मधून तातडीने निधी मंजूर करून दिला.
            यावेळी भूमिपूजन सोहळा  उपस्थित मा.श्री,चंदुभाऊ मारगोनवार सभापती पंचायत समिती मुल मा.श्री,दिलीपभाऊ पाल माजी उपसरंपच मा.श्री,अशोकभाऊ मारगोनवार उपसरंपच मा.श्री, खुशाल पा शेरकी शाळा.व्य अध्यक्ष मा.श्री,विनोद कोहपरे ग्रा.प.सदस्य मा.श्री,चिंतामण शेरकी मा.श्री,सचिन निशाणे मा.श्री,दीपक कडुकार मा.श्री, प्रफुल कडुकार मा.श्री,राजु कावळे व गावकरी मंडळी उपस्थीत होते