मोठी बातमी! ‘या’ वर्गांतील विद्यार्थी विनापरिक्षा ‘पास’; शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची घोषणा

44

मुंबई – राज्यातील वाढत्या करोनाच्या पार्श्वभूमीवर इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश मिळणार आहे. राज्यातील करोना स्थिती पाहता, राज्यातील राज्य मंडळाच्या सर्व शाळांमधील इयत्ता पहिली ते आठवीड्या विद्यार्थ्यांना परीक्षेशिवाय पुढील वर्गात प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी माहिती दिली आहे.

करोनामुळे यंदाचे शालेय शिक्षण विभागाचे शैक्षणिक वर्ष ऑनलाइन पद्धतीने सुरु झाले होते. अनेक ठिकाणी शाळा सुरु होऊ शकल्या नाहीत. ज्या ठिकाणी सुरु झाल्या त्या ठिकाणी देखील अभ्यासक्रम पूर्ण झालेला नाही. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना विनापरीक्षा पास करून पुढच्या वर्गात प्रमोट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

इयत्ता पहिली ते आठवीचा निकाल हा सर्वंकष मूल्यमापन पद्धतीद्वारे जाहीर केला जातो. मात्र, यंदा करोनामुळे अभ्यासक्रम पूर्ण होऊ शकला नाही. मूल्यमापन होऊ शकले नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना विनापरीक्षा पुढील वर्गात प्रवेश देण्याचा निर्णय घेतला असल्याचे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले.