इयत्ता ५ वी व इयत्ता ८ वी शिष्यवृत्ती परीक्षा एप्रिल २०२१ करीता शाळा नोंदणी व विद्यार्थी ऑनलाईन आवेदनपत्र भरणेसाठी दिनांक १०/०४/२०२१ रोजीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

32
शिष्यवृत्ती परीक्षा – २०२१ ही दि. २५ एप्रिल, २०२१ ऐवजी २३ मे, २०२१ रोजी घेण्यात येणार आहे.

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणेच्या वतीने दरवर्षी घेण्यात येणारी पूर्व उच्च प्राथमिक व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा कोरोना संसर्गाच्या कारणामुळे पुढे ढकलण्यात आली. यासंदर्भात राज्याच्या शालेय शिक्षण विभागासह परीक्षा परिषद पुणेच्या वतीने निर्णय जाहीर करण्यात आला. आता नव्या निर्णयानुसार ही शिष्यवृत्ती परीक्षा २३ मे २०२१ रोजी घेण्यात येणार आहे.

इयत्ता पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षेसाठी अर्ज भरण्याकरिता मुदतवाढ देण्यात आली आहे. १० एप्रिल २०२१ पर्यंत या परीक्षेसाठी संबंधित शाळांना त्यांच्या विद्यार्थ्यांचे ऑनलाइन आवेदनपत्र भरता येणार आहे. यासंदर्भात महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणेचे उपायुक्त शैलजा दराडे यांनी ३० मार्च २०२१ रोजी प्रसिद्धीपत्र जारी केले आहे. त्यानुसार शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत.