Pan Card ला Aadhar Card लिंक करण्यासाठी मुदतवाढ; आयकर विभागाचा निर्णय

43

Pan Card ला Aadhar Card लिंक करण्यासाठी मुदतवाढ; आयकर विभागाचा निर्णय

पॅनकार्डला आधार कार्ड लिंक करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. कोरोना महामारीमुळे मुदतवाढ देण्यात आल्याचं ट्वीट आयकर विभागाने केलं आहे. आता 30 एप्रिल 2021 पर्यंत ही मुदतवाढ देण्यात आली आहे.

नवी दिल्लीः पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करण्याची आज 31 मार्च शेवटची तारीख होती, पण ती तारीख आता वाढवण्यात आलीय. मोदी सरकारने पॅनशी आधार क्रमांक जोडण्याची अंतिम तारीख 30 जून 2021 पर्यंत वाढविली. आयकर अधिनियम 1961 च्या कलम 148 अन्वये नोटीस बजावण्याची तारीख, विवाद निवारण पॅनेलने (DRP) जारी केलेल्या निर्देशासाठी निकालाचा आदेश मंजूर करणे आणि समानता आकारणी निवेदनांवर प्रक्रिया करण्यासाठीही 30 एप्रिल 2021 पर्यंत मुदतवाढ देण्यात आलीय. (Good news! Extension to add PAN card and Aadhar card, can now be linked till 30th June, 2021)

तांत्रिक दबावामुळे वेबसाईट क्रॅश झाल्यानं करदात्यांच्या अडचणीत वाढ

विशेष म्हणजे 31 मार्चची मुदत संपण्यापूर्वीच अधिक लोड आल्यामुळे बुधवारी इन्कम टॅक्सची वेबसाईट क्रॅश झाली होती. आर्थिक वर्ष 2020-21 आर्थिक वर्षाचा आज शेवटचा दिवस होता. तांत्रिक दबावामुळे वेबसाईट क्रॅश झाल्यानं आर्थिक कामे पूर्ण करण्यात करदात्यांना अडचणी आल्या. त्यामुळे ही पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करण्याच्या तारखेला मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.

 

मुदतवाढ देण्याची होती मागणी

आयकर विभागाची वेबसाईट क्रॅश झाल्यामुळे लोक फार त्रस्त झाले आहेत. याबद्दल सोशल मीडियावर ते पोस्ट करत होते. सर्वात आधी बुधवारी दुपारी साडे बाराच्या सुमारास आयकर विभागाची साईट क्रॅश झाली, त्यानंतर ती पूर्ववत केली गेली. परंतु त्यानंतरही वेबसाईट वारंवार क्रॅश होत होती. त्यामुळे लोक सोशल मीडियावर आयकर विभागाकडे 31 मार्च रोजी होणारी अंतिम मुदत वाढविण्याची मागणी करत होते, त्यानुसारच ही मुदतवाढ देण्यात आलीय.

आयटीआर दाखल करण्यासाठी ही कागदपत्रं आवश्यक

आयटीआर दाखल करण्यासाठी तुमचे पॅनकार्ड, आधार कार्ड, बँक खाते क्रमांक, गुंतवणुकीचा तपशील व त्याचा दाखला / प्रमाणपत्र, फॉर्म -16, फॉर्म -26 AS आदि कागदपत्रे जवळ ठेवावी लागतील. आयटीआर दाखल करताना ही सर्व कागदपत्रे आवश्यक आहेत.

अधिकृत वेबसाईटवरुन करा लिंक

यासाठी, आपल्याला इनकम टॅक्सची अधिकृत वेबसाईट https://www1.incometaxindiaefiling.gov.in/eFilingGS/Services/AhaarPreloginStatus.html वर जावे लागेल. लिंक ओपन झाल्यानंतर तुम्हाला दोन बॉक्स दिसतील. यापैकी एका बॉक्समध्ये तुम्हाला तुमचा आधार क्रमांक टाकावा लागेल. दुसर्‍या बॉक्समध्ये पॅन क्रमांक टाका. त्यानंतर व्ह्यू लिंकआधार स्टेटस वर क्लिक करा. त्यावर क्लिक करून, जर तुमचे आधार कार्ड पॅन क्रमांकाशी जोडलेले असेल तर तुम्हाला सक्सेसचा संदेश मिळेल. जर आधार आणि पॅनचा संबंध नसेल तर त्यांची स्थिती कळवली जाईल. यामुळे आपण आधार पॅनशी का जोडलेले नाही हे जाणून घेऊ शकता.

एसएमएसद्वारे करु शकता लिंक

जर पॅन आणि आधार जोडलेले नसेल तर आपण पुन्हा लिंक करण्याचा प्रयत्न करू शकता. यासाठी आपण इनकम टॅक्सच्या वेबसाईटवर जाऊ शकता. एसएमएसद्वारे पॅन आणि आधारला जोडण्यासाठी, UIDPAN <12-digit Aadhaar> <10-digit PAN> टाईप करून 567678 किंवा 561561 वर संदेश पाठवा. ज्यांनी आपले आधार कार्ड आणि पॅन लिंक केलेले नाहीत, त्यांना आज शेवटच्या तारखेनंतर लिंक केल्यास त्यांना एक हजार रुपयांपर्यंत दंड भरावा लागू शकतो. याशिवाय पॅन अकार्यक्षम ठरू शकते आणि बँकेची अनेक कामेही अडकू शकतात.

असे करा ऑफलाईन लिंक

पॅन सेवा प्रदाता, NSDL या UTIITSLच्या सर्विस सेंटरवर जाऊन पॅन आणि आधार लिंक केले जाऊ शकते. त्यासाठी ‘Annexure-I’ फॉर्म भरावा लागेल आणि पॅन कार्ड आणि आधार कार्डची प्रत सोबत घ्यावी लागेल. ही प्रक्रिया विनामूल्य नाही. यासाठी तुम्हाला निश्चित फी भरावी लागेल. लिंक करताना पॅन किंवा आधार तपशिलात सुधारणा करण्यात आली की नाही यावर ही फी अवलंबून असेल.