मूल तालुक्याच्या आगडी गावातील मोहफुल वेचायला गेलेल्या महिलेवर वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना

36

मोहफुल वेचण्यास गेलेल्या महिलेवर वाघाचा हल्ला
मूल:- मूल तालुक्याच्या आगडी गावातील मोहफुल वेचायला गेलेल्या महिलेवर वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना आज दिनांक 31 मार्चला सकाळी 11 वाजताच्या सुमारास घडली. कल्पना नामदेव वाढई (54) असे मृत महिलेचे नाव आहे. सध्या सर्वत्र मोहफुल आलेले आहेत. गा्रमिण भागात मजुरी नसल्यामुळे ग्रामिण भागातील लोक मोहफुल वेचुन त्याच्यावर आपले उदार निर्वाह करतात.
अशातच आगडी येथील कल्पना नामदेव वाढई (54) आणि तीची आई कौशल्या मांदाळे आज गावाला लागूनच असलेल्या जंगल परिसरात दोघेही मोहफुल वेचायला गेले. मोहफुल खुप उशिरा पर्यंत पडत असल्याने आई कल्पना वाढई हिची आई कौशल्या मांदाळे ही म्हातारी असुन ती जेवन करायला घरी आली,दरम्यान ही घटना घडली.