Caste Certificate. | जातीचा दाखला.

67
नमस्कार,
              जातीचा दाखला हा सध्या शैक्षणिक कामासाठी नोकरीसाठी  निवडणुकीसाठी शासकीय योजनेचे लाभ घेण्यासाठी अशा भरपूर कामासाठी जाती दाखला याला महत्व आहे.  पण जातीचा दाखला काढायचा म्हणजे भरपूर जणांना डोकेदुखी होते त्यासाठी कागदपत्रे कुठले जोडावीत,पुरावे कोणती जोडावीतपुरावे कोणत्या सालीची हवेहे अर्ज कुठे करता येईल अशा भरपूर प्रश्न मनामध्ये असतात. पण आपण जाती दाखल्यासाठी अर्ज करणे अगोदर जर पूर्ण माहिती घेऊन जर अर्ज केल्यास आपला अर्ज मंजूर होऊन आपल्याला जाती दाखला मिळणे अगदी सोपे होईल. आणि आपण प्रत्येक वेळी जेव्हा जाती दाखल्याची गरज असते त्याच वेळी आपण अर्ज करण्याचा आपण प्रयत्न करतो पण अगोदर आपण जाती दाखला काढून ठेवल्यास भविष्यामध्ये आपल्याला कधीच अडचण येणार नाही आणि वेळी आपली धावपळ होणार नाही. त्यासाठी घरातील सर्व व्यक्तींचे जातीचे दाखले काढून ठेवावेत त्यामध्ये वयस्कर किंवा नुकताच जन्मलेला मुलाचाही जाती दाखला काढता येतो फक्त त्याच्याकडे जर जन्मदाखला असल्यास पुरेसा आहे.

जातीचा दाखला कोणाला मिळवता येतो.

 महाराष्ट्रामध्ये जातीचा दाखला काढण्यासाठी अनुसूचित जातीअनुसूचित जमातीइतर मागास वर्गविमुक्त जाती व भटक्या जमातीमराठा  यातले महाराष्ट्रातून मिळतात. या प्रवर्गामध्ये येणारे सर्व व्यक्तींना जातीचा दाखल्यासाठी अर्ज करता येतो आणि त्यांना जातीचा दाखला मिळतो.
 जातीच्या दाखल्यासाठी अर्ज कोठे करावा.
 जातीचा दाखला काढण्यासाठी  अर्ज करण्यासाठी आपल्यासमोर तीन पर्याय आहेत.  तालुक्याच्या ठिकाणी किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी असणारा  सेतू केंद्र,किंवा आपल्या भागामध्ये असलेला आपले सरकार सेवा केंद्रकिंवा आपले सरकार पोर्टल च्या नागरिकाच्या लॉगिन मधून जाते दाखल्यासाठी अर्ज करता येतो.
  जातीचा दाखला काढण्यासाठी कोणती पुरावे जोडावीत.
 जातीचा दाखला काढण्यापूर्वी आपण जर योग्य कागदपत्रांची जुळवाजुळव करून ठेवल्यास जातीचा दाखला मिळणे सोपे होईल. त्यासाठी आपल्याला पुरावा म्हणून शाळा सोडलेला दाखला किंवा घरातील किंवा रक्त संबंधातील व्यक्तीचे  जात पडताळणी झाले असल्यास ते पुरावा म्हणून जोडता येते किंवा ग्रामपंचायत किंवा तहसील कार्यालय यामधील जन्म मृत्यू नोंद वहीतील उतारा आपण पुरावा म्हणून जोडू शकतो आणि इतर.
  जातीच्या दाखल्यासाठी पुरावे जोडताना हे लक्षात घ्यावे.
 जातीच्या दाखल्यासाठी पुरावे जोडताना ज्या प्रवर्गासाठी पुरावा जोडायचा आहे.  त्या साठी कोणत्या सालीचे पुरावे  जोडणे बंधनकारक आहे.  त्याअगोदर चे पुरावे जोडता येईल नंतरचे जोडता येणार नाही.
 उदा.- उद्या अनुसूची 1950   पूर्वीचा पुरावा जोडणे बंधनकारक आहे. या यासाठी 1949, 1948, 1947, किंवा त्या अगोदर चे   पुरावे जोडल्यास चालेल पण त्यानंतरचे जसे 1951, 1952, 1953,किंवा यानंतर चे पुरावे जोडल्यास चालणार नाही.
 जातीप्रमाणे पुरावी कोणती जोडावे.
 अनुसूचित जातीसाठी  आणि अनुसूचित जमातीसाठी- 1950   त्यापूर्वीचा.
 विशेष मागास वर्गविमुक्त जाती व भटक्या जमाती साठी- 1961 व त्यापूर्वीचा.
 इतर मागास वर्ग  मराठा साठी- 1967   त्यापूर्वीचा.
 जातीच्या दाखल्यासाठी कागदपत्रे कोणती जोडावीत.
 जातीच्या दाखल्यासाठी अर्ज करण्यापूर्वी सर्व कागदपत्रे तयार करावीत मग जातीच्या दाखल्यासाठी अर्ज करण्यासाठी जावे.
 ओळखीचा  पुरावा आणि पत्त्याचा पुरावा साठी आधार कार्डरेशन कार्डड्रायव्हिंग लायसन्सपॅन कार्ड आणि इतर यातील कोणतीही कागदपत्रे जोडावी. कागदपत्रे   जोडताना पत्त्याचा पुरावा आणि ओळखीचा पुरावा वेगवेगळ्या जोडावा.
 ज्यांच्या नावाने  दाखला हवे आहे  त्यांचे जन्मदाखलाशाळा सोडायला दाखलाबोनाफाईड सर्टिफिकेटजन्म मृत्यू नोंद वहीतील उतारा आणि इतर.  यापैकी कागदपत्रे जोडावी
त्यानंतर संबंधित जातीप्रमाणे जातीचा पुरावा जोडावा जातीचा पुरावा जोडताना ज्यांचे पुरावा आपण जोडत आहोत ते आपल्या रक्त संबंधातील असणे गरजेचे आहे. किंवा चुलत वगैरे असल्यास त्यांचे नातेसंबंध स्पष्ट करणारे कागदपत्रे जोडावीत.   नातेसंबंध स्पष्ट होत नसल्यास जातील  असल्यास मंजुरी मिळणार नाही.
 जाती दाखला अर्ज करण्यापूर्वी वंशावळ बनवावे आणि सदर वंशावळी प्रमाणे कागदपत्रे जोडावीत.
वंशावळ कशी बनवावी.
 वंशावळ बनवताना ज्यांची पुरावे आपण जाणार आहोत आणि ज्यांना जातीचा दाखला हवा आहे. त्यांचे नातेसंबंध स्पष्ट होणारे वंशावळ बनवणे गरजेचे आहे.
जातीचा दाखला किती दिवसात मिळेल.
 जातीचा दाखला मिळण्यासाठी नियमाप्रमाणे 21 दिवसाचा कालावधी लागतो पण ह्या अगोदर सुद्धा मिळू शकते.
 जाती दाखला मंजूर प्रक्रिया.
जातीच्या दाखल्यासाठी अर्ज केल्यानंतर प्रथम आपला अर्ज नायब तहसीलदार यांच्या डेस्कला जातो. त्यानंतर त्या ठिकाणी त्यांनी च्या अर्जाची पडताळणी करून योग्य असल्यास तहसीलदार त्यांच्या डेस्कला पाठवतील त्यानंतर ते अर्ज  योग्य असल्यास उपविभागीय अधिकारी  यांच्या कार्यालयात पाठवतील अन्यथा काही त्रुटी असल्यास माघारी अर्जदाराकडे किंवा आपले सरकार सेवा केंद्रा कडे पाठवतील त्यानंतर आपला अर्ज उपविभागीय कार्यालयात आल्यास आपल्या पडताळणी करून योग्य असल्यास दाखला मंजूर होईल अन्यथा काही त्रुटी असल्यास परत माघारी अर्जदाराकडे किंवा आपले सरकार सेवा केंद्रा कडे अर्ज पाठवण्यात येईल. त्यानंतर लागलेले संबंधित त्रुटी पूर्ण करून परत अर्ज पुढे  पाठवता येतो.