प्लास्टिक विक्रेत्यांवर कारवाई

39
प्लॉस्टिक विक्रेत्यांवर मूल नगर परिषदेने कारवाईचा बडगा
मूल (प्रतिनिधी)
पालिकेच्या आरोग्य विभागाकडून  प्लास्टिक विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर दंडात्मक कारवाई केली.  शहरात होणारे प्लास्टिक  विक्रीला पायबंद घालण्याचा निर्धार पालिका प्रशासनाने केला आहे. त्यानुसार दंडात्मक कारवाई करण्यात आली.
        मूल शहरातील अवैद्य प्लॉस्टिक विक्रेत्यांचे विरोधात मूल नगर परिषदेने कारवाईचा बडगा उगारल्यांने, अवैद्य प्लॉस्टिक विक्रेत्यांत खळबळ माजली आहे.नगर परिषदेचे मुख्याधिकारी सिध्दार्थ मेश्राम यांचे नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली.
शहरात कोरोना संसर्ग वाढू नये यासाठी मुख्याधिकारी मेश्राम यांचेसह नगर परिषदेचे कर्मचारी गांधी चौकात मास्कची मोहीम राबवित असतांना, स्थानिक गांधी चौकातील दुकानात प्रतिबंधीत असलेल्या प्लॉस्टिक ग्लास, वाटीची सर्रास विक्री होत असल्यांचे त्यांना निदर्शनास आले. व्हेरायटी जनरल स्टोअर्स, नागरेचा पान मटेरियर, करण किराणा स्टोअर्स आणि मयूर जनरल स्टोअर्स यांचे दुकानात धाड मारून, 4 पोते प्लॉस्टीक पिशव्या, 4 पोते प्लॉस्टिक ग्लास, 2 पो​ते प्लॉस्टिक प्लेट, 1 पोता थर्माकोल शिट, 1 पोता थर्माकोल प्लेट, 1 पोते थर्माकोल बॉल असे एकूण 75 हजाराचा मुद्देमाल जप्त केला.
बंदी असलेल्या प्लॉस्टिकची विक्री केल्यांचे कारणावरून, व्हेरायटी जनरल स्टोअर्स व मयूर जनरल स्टोअर्स यांना प्रत्येकी 10 हजार तर, नागरेचा पान मटेरियल व करण किराणा स्टोअर्स यांचेकडून प्रत्येकी 5 हजार रूपये दंडाची आकारणी करण्यात आली.
        या मोहीमेत मुख्याधिकारी सिध्दार्थ मेश्राम यांचेसह कार्यालय अधिक्षक तुषार शिंदे, कार्यालय प्रमुख विलास कागदेलवार, अभियंता श्रीकांत समर्थ, विशाल मुळे, सुरज त्रिशुलवार, आरोग्य निरीक्षक अ​भय चेपूरवार हे सहभागी झाले होते.
प्लॉस्टिक बंदी नंतर पहिल्यांदाच मूल नगर परिषद अॅक्शन मोडमध्ये आल्यांने अनेकांनी समाधान व्यक्त केले. मूल शहरात अनेक व्यापार्यांनी आपल्या गोडावून मध्ये लाखो रूपयाचे प्रतिबंधीत प्लॉस्टिकचा साठा केला असून, नगर परिषदेने हा मालही जप्त करावा अशी मागणी जोर धरत आहे.