बँकेची कामं आताच आटपा…सलग ३ दिवस सर्व बँका बंद

36

मुंबई : तुमची बँकेची कामं राहिली असतील, तर २७ मार्च आधीच करून घ्या. कारण २७ मार्च ते २९ मार्च अशा ३ दिवस देशभरात बँका बंद राहणार आहेत.

मार्च २७ ला शनिवार तर २८ ला रविवार म्हणून बँका बंद राहतील. २९ मार्चला बँकांना होळीची सुट्टी असेल. त्यानंतर ३० तारखेला बँका सुरू राहतील. पण ३१ मार्चला बँका पुन्हा ग्राहकांसाठी बंद राहतील. आर्थिक वर्षाचा शेवटचा दिवस म्हणून त्या कामांकरिता बँका सुरू असतात, मात्र ग्राहकांसाठी त्या बंद असतात.

तसं बघायला गेलं तर पुढच्या आठवड्यात तुम्हाला बँकेची कामं करायची असतील, तर दिवस पाहूनच करावी लागतील. कारण २ एप्रिलला शुक्रवार आहे, त्या दिवशीही गुड फ्रायडेनिमित्त बँका बंद राहतील. त्यामुळे पुढच्या आठवड्यात बँका ३० मार्च आणि ३ एप्रिलला बँका सुरू राहतील.

नेमक्या कोणत्या तारखेला बँका सुरू आणि कधी बंद?

२७ मार्च शनिवारची सुट्टी

२८ मार्च रविवारची सुट्टी

२९ मार्च होळीची सुट्टी

३० मार्च बँक सुरू

३१ मार्च आर्थिक वर्षाअखेरच्या कामकाजामुळे ग्राहकांसाठी बंद

१ एप्रिल आर्थिक वर्षाच्या पहिल्या कामानिमित्त ग्राहकांसाठी बंद

२ एप्रिल गुड फ्रायडे

३ एप्रिल बँक सुरू

४ एप्रिल रविवारची सुट्टी