औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये प्रात्यक्षिकांचे जुने फोटो विद्यार्थ्यांना देऊ नये – प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा आरोप जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. संध्या गुरनुले यांना दिले निवेदन

51

औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये प्रात्यक्षिकांचे जुने फोटो विद्यार्थ्यांना देऊ नये – प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा आरोप

जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. संध्या गुरनुले यांना दिले निवेदन

मूल : औद्योगिक क्षेत्रात काम करणाऱ्या मुलांना प्रॅक्टिकल ज्ञान महत्त्वाचे असते. त्यामुळे विद्यार्थी कुठलीही गोष्ट कॉपी न करता स्वतः कोणतीही गोष्ट आत्मसात करायला हवी.परंतू औद्योगिक प्रशिक्षण संस्था मूल येथील तारतंत्री ट्रेड मध्ये प्रात्यक्षिक घेतल्यावर त्यांना त्यांची माहिती लिहण्यासाठी गेल्या सत्रामधील लिहलेली प्रात्यक्षिकांचे फोटो मुलाच्या मोबाइलवर टाकतात.
सदर माहितीनुसार प्रशिक्षण घेणारे प्रशिक्षणार्थी जशेच्या तशे मोबाइलवरून बघून आपल्या नोंद वही मध्ये लिहतात. त्यामुळे प्रशिक्षण घेणाऱ्या मुलांना ती माहिती अभ्यास न करता लिहून घेतात. अस केल्याने प्रशिक्षण घेणाऱ्यांना आपल्या डोक्याचं वापर न करता सहज माहिती उपलब्ध होते. त्यामुळे मुलांचा सर्वांगीण विकास होत नाही. अस प्रशिक्षण घेणाऱ्या मुलांनी आरोप केलेला आहे.
सदर निवेदनाच्या माध्यमातून जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. संध्या गुरनुले यांनी मुलांशी संवाद साधत लवकरच न्याय मिळवुन देण्याचे आश्वासन दिले आहे.