31

संजय गांधी निराधार योजनेची प्रकरणे मंजुरी
मूल (प्रमोद मशाखेत्री):- संजय गांधी निराधार योजनेच्या प्रकरणाला मंजूरी देण्याच्या अनुषंगाने आढावा बैठक नुकतीच पार पाडली.या बैठकीत श्रावणबाळ योजनेतंर्गत,दुर्धर आजार योजनेतंर्गत,इतर योजनेअंतर्गत अशा प्रकरणाचा मंजुरी 134 पैकी 129 प्रकरण मंजुर प्रदान करण्यात आली.
संजय गांधी निराधार योजनांच्या अध्यक्षपदाची धुरा राकेश रत्नावार यांच्या हातात येतात दुसरी बैठक नुकतीच पार पडली.
या बैठकीत सर्व प्रकारच्या अर्जाची तपासणी करण्यात आली आवश्यक त्या कागदपत्राची पूर्तता करणा-या इंदिरा गांधी वृध्दपकाळ,श्रावणबाळ योजनेतंर्गत,दुर्धर आजार योजनेतंर्गत,इतर योजनेअंतर्गत 134 पैकी 129 प्रकरण मंजुर
इतक्या मोठया प्रमाणात प्रकरणांना मंजुरी मिळाल्याने अनुदानाचा प्रतीक्षेत असलेल्या निराधार व गरजू नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
बैठकीला अध्यक्ष राकेश रत्नावार, नायब तहसिलदार पवार ,गटविकास अधिकारी खडसे,अशासकीय सदस्य नितीन येरोजवार, दशरथ वाकुडकर, सत्यनारायण अमरूदिवार, रूपाली संतोषवार, चावरे मॅडम व इतर सदस्य  आदी उपस्थित होते.