मॅजिक बसतर्फे जागतिक महिला दिन

27

मॅजिक बसतर्फे जागतिक महिला दिन

मूल:- मॅजिक बस संस्थेचे वरिष्ठ जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रशांत लोखंडे यांच्या मार्गदर्शनात व तालुका निरिीक्षक निकिता ठेंगणे यांच्या नेतृत्वात मॅजिक बस इंडिया फाऊडेशन चंद्रपूर संस्थेच्या वतीने मूल तालूक्यात स्केल कार्यक्रमातर्गत 12 ते 16 वर्षे वयोगटातील 7003 विद्याथ्र्यांच्या सर्वागीण विकासासाठी खेळव्दारे शिक्षण जीवन कौशल्य विकास हा कार्यक्रम मागील वर्षापासून अविरतपणे राबविला जात आहे.त्याच अनुषंगाने 8ते 12 मार्च या कालावधीत जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला.
यावेळी मूल तालुक्यातील        मूल,चिचाळा,फिस्कुटी,मरेगाव,बेंबाळ,मोरवाही,दाबगाव,खलवसपेठ,सिंथाळा,चांदापूर,भवराळा,नांदगाव,डोगरगाव,राजोली,सुश्सी,
चिखली आदी गावामध्ये महिला दिनानिर्मीत्य विविध स्पर्धाचे आयोजन करण्यात आले व स्पर्धेत यशस्वी होणा-या तसेच सहभागी महिलांना
भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले.
स्त्री हा कुटुंबाचा कणा असते आणि उद्याचे भविष्य घडविण्याच्या कार्यात महत्वपूर्ण भूमिका बजावत असते. त्यामुळे स्त्रियांना हक्काचे
व्यासपीठ लाभावे जेणेकरून त्या अंगी असलेली कलागुण सादर करतील. या हेतूने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
महिलांचा सहभाग हेाता. अध्यक्षस्थानी गावातील सरपंच,तर प्रमूख पाहूणे म्हणून गावातील उपसंरपच,ग्रामसेवक,ग्रामपंचायत सदस्य,अंगणवाडी सेविका आशा वर्कर्स व प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शाळा सहायक अधिकारी संदेश रामटेके,आकाश गेडाम,दिनेश कामतवार,शुभांगीरामगोणवार व मॅजिक बस संस्थेने नेमणूक केलेले प्रत्येक गावातील समुदाय समन्वयक यांनी प्रयत्न केले.