केंद्रसरकर विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आंदोलन

43

केंद्रसरकर विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आंदोलन

मूल :-

मूल शहर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस ह्यांचे सूचनेनुसार दिनांक 14 मार्च ला सकाळी 10 वाजता मूल शहरात विविध ठिकाणी बॅनर व होर्डिंग लावून वाढत्या पेट्रोल डिझेलच्या किमती, बेसुमार वाढलेली बेरोजगारी, सतत कोसळणारा शेअर बाजार , gdp ची घसरण ,वाढती महागाई या विरोधात केंद्रासरकारचा तीव्र निषेध करून आंदोलन करण्यात आले.
मूल शहरात हे निषेध आंदोलन पेट्रोलपंप, सोमनाथ रोड, चंद्रपूर रोड , नागपूर रोड आदी ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे चे युवा नेते सुमित समर्थ यांच्या नेतृत्वात करण्यात आले. सदर आंदोलनात मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करून केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला. जर पेट्रोल डिझेल व गॅस ची दरवाढ व वाढती महागाई कमी झाली नाही तर तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देऊन करून केंद्र सरकारचा जाहीर निषेध करण्यात आला. या निषेध आंदोलनात किसन वासाडे, महिला शहराध्यक्ष अर्चना चावरे ,भास्कर खोब्रागडे, प्रशांत भरतकर, दिनेश जिद्दीवार हेमंत सुपणार, सुरज तोडसे ,इंद्रपाल पुणेकर, रितीक संगमवार,हरिदास मेश्राम, राहुल बारसगडे व बहुसंख्य कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला.