दुचाकीची ट्रकला जोरदार धडक, दोघे जण गंभीर जखमी

45

दुचाकीची ट्रकला जोरदार धडक, दोघे जण गंभीर जखमी

मूल :-  दुचाकीने ट्रकला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले आहेत, ही घटना चंद्रपूर जिल्ह्यातील मुल शहरांमध्ये घडली असून जखमींना चंद्रपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात पुढील उपचाराकरिता पाठवण्यात आले आहे.

चामोर्शी येथील रहिवासी चेतन वासलवार आणि मुल येथील आकाश शेंडे हे दोघेही चामोर्शि ला जाण्याकरता निघाले असता चामोर्शी रोड वरील हिमालय राईस मिल समोर SMS राईस मिल मधून करिमनगर आंध्रप्रदेश येथे

तांदूळ घेऊन जाणाऱ्या ट्रक क्रमांक एपी 20 टी ए 59 76 या ट्रकला मोपेड क्रमांक mh33 वाय 54 59 जोरदार धडक दिल्याने चेतन आणि आकाश यांना गंभीर दुखापत झाली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळावर येऊन तात्काळ जखमींना उपजिल्हा रुग्णालय मुले येथे दाखल केले, त्यानंतर त्यांना चंद्रपूर येथील जिल्हा रुग्णालयामध्ये पुढील उपचाराकरिता पाठवण्यात आले आहे. चेतन वासलवार आणि आकाश शेंडे  वाहनावरील नियंत्रण सुटले आणि विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकला धडक दिल्याने हा अपघात झाल्याचे  सांगितले आहे.