चंद्रपूर महानगरपालिकेने भगवान बिरसा मुंडा यांचा पुतळा पुनर्स्थापित करावा.

41

चंद्रपूर महानगरपालिकेने भगवान बिरसा मुंडा यांचा पुतळा पुनर्स्थापित करावा.

आदिवासी समाजाने तहसील कार्यालय मूल च्या प्रवेशद्वारासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करून तीव्र निषेध केला.

मूल :-

क्रांतीवीर भगवान बिरसा मुंडा यांचा पुतळा मनपा चंद्रपूर प्रशासनाने उद्दटपणे हटवून क्रांतीविरांचा अवमान करून आदिवासी बहूजन समाजाची अस्मीता पायदळी तुडविल्याच्या घृणित घटनेचा तीव्र निषेध आदिवासी समाजाने केला आहे. चंद्रपूर महानगरपालिकेने भगवान बिरसा मुंडाचा पूर्णाकृती पुतळा सन्मानाने पुर्ववत त्याच ठिकाणी स्थापीत करावा अशी मागणी मूल तालुक्यातील आदिवासी समाजाने केली आहे.

आदिवासी अस्मीतेचे ज्वलंत प्रतिक असलेले उध्दारक भारतीय सामाजीक,राजकीय क्रांतीच्या इतिहासातील सशक्त क्रांतीकारक ,ब्रिटीश सत्तेचा पाया आपल्या ऊलगुलान आंदोलना व्दारे हादरवून टाकणारे थोर स्वातंत्र सेनानी महान क्रांतीवीर भगवान बिरसा मुंडा यांच्या पुर्णाकृती पुतळा चंद्रपूर येथील जिल्हाधिकारी कार्यालय प्रवेशव्दार आणि रेल्वे स्टेंशन रोड समोरील परिसरात आदिवासी समाज बांधवांच्या व समविचारी लोकांच्या उत्स्पुर्त सहभागातून दिनांक 21 फेब्रवारी 2021 रोजी बसविण्यात आला होता.
परंतू चंद्रपूर महानगरपालीका,जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासन यांनी घृणीतपणे महान बिरसा मुंडा यांचा जनतेनी स्थापीत केलेला पुतळा दिनांक 27 फेब्रवारी 2019 रोजी पोलीस बळाचा दहशतपुर्ण वापर करून अत्यंत बेमुर्वतपणे हटवून उचलून नेला. हे अंत्यंत नीचपणाचे कृत्य प्रशासनाने घडवून आणले आहे.

या नीच कृत्याचा आदिवासी समाजाने तहसील कार्यालय मूल च्या प्रवेशद्वारासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करून तीव्र निषेध केला. प्रशासनाने संपूर्ण सन्मानाने क्रांतीविर बिरसा मुंडा यांचा पुतळा पुर्ववत त्याच ठिकाणी स्थापित करावा. याबाबतचा निर्णायक इशारा प्रशासनाला अदिवासी समाजाने दिला आहे. आदिवासी समाज व जनभावनेचा विचार करून शासन व प्रशासनास ताबडतोब कळवावे असे निवेदन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना तहसिदार मूल यांच्या मार्फतीने दिले आहे. तहसीलदार डॉ. रवींद्र होळी याना निवेदन देताना पंकज गेडाम,लक्ष्मण सोयाम,कपूरदास गेडाम ,बाबूराव कन्नाके,प्रकाश कुळमेथे,गंगाधर जुमनाके,गणेश तोडासे,रंजनी कुळमेथे,प्रियंका गेडाम,वेणुताई कुळमेथे, कुसुम मडावी,पुष्पा गेडाम,शोभा गेडाम,नलिना गेडाम,विद्या कुमरे,वैष्णवी आत्राम,सुनिता कन्नाके,दशरथ मडावी,मानिक मडावी,सुखदेव कन्नाके,देवानंद कन्नाके,लालशामशाह पेंदाम आदी आदिवासी समाजबांधव उपस्थित होते.