मूल शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रमुख कार्यकर्त्यांची आढावा बैठक संपन्न

28

मूल शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रमुख कार्यकर्त्यांची आढावा बैठक संपन्न
संपूर्ण नियोजनबद्ध व ताकदीनिशी मूल नगर पालिका निवडणूक लढवणार – जिल्हाध्यक्ष – राजेंद्र वैद्य
मूल :- महाशिवरात्रीचे औचित्य साधून राष्ट्रवादी कॉंग्रेसचा विस्तार करण्याच्या दृष्टीने मूल येथे राष्ट्रवादी काँग्रेस चे युवा नेते सुमित समर्थ ह्यांच्या रुक्मिणी वाड्यावर शहरातील प्रमुख कार्यकर्त्यांची आढावा बैठक दिनांक 11मार्च ला दुपारी 2:00 घेण्यात आली .
कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस चे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य, जेष्ठ नेते महादेवराव पीजदूरकर, जेष्ठ नेते डॉ.आनंद अडबाले, बल्लारपूर तालुकाध्यक्ष बादल उराडे उपस्थित होते.

प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस मूल चे युवा नेते सुमीत समर्थ , निपचंद शेरकी,शहर महिलाध्यक्ष अर्चना चावरे, किसन वासाडे, भास्कर खोब्रागडे, विपीन भालेराव, दिनेश जिद्दीवार, ,प्रशांत भरतकर , दीपक महाडोळे, महेश जेंगठे, राकेश मोहूर्ले, सोनू लाडवे,गुरुदास गिरडकर , इंद्रपाल पुणेकर,हेमंत सुपणार,सागर राऊत, रुपेश येणप्रेड्डीवार, हरीश रायपुरे, रितीक संगमवार, मिथुन चिताडे, शिरीष खोब्रागडे,संजय चिटमलवार,नंदकिशोर कावळे,असद खान, हरिदास मेश्राम,प्रभाकर कावळे, गणेश कावळे, कुणाल टींगूसले,संतोष गुंडावार,सतीश केंद्रे,राहुल बारसागडे,आदी मान्यवर उपस्थित होते .यावेळी जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य यांनी कार्यकर्त्यांशी चर्चा करून त्यांच्याकडून सूचना जाणून घेतल्या. व शहरातील प्रत्येक वार्ड मध्ये पक्षबांधणी करून शहरात कार्यकर्त्यांचे अडचणी सोडविण्याचे आश्वासन दिले. व संपूर्ण ताकदीने मूल नगरपालिकेची येणारी निवडणूक लढण्याचा निर्धार केला.

पक्ष प्रवेशा बाबत पक्षाचे जेष्ठ नेते व मंत्री यांचे मेळावे घेन्याचे ठरले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस चे युवा नेते सुमीत समर्थ यांनी मुल नगरपालिकेची होणारी निवडणूक संपूर्ण ताकदनिशी लढण्याची व एकला चलो रे अशी स्पष्ट भूमिका मांडली. ह्याला सर्व प्रमुख कार्यकर्त्यांनी होकार दर्शविला. यावेळी कार्यकर्त्यात प्रचंड उत्साह पहायला मिळाला.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी विषेश परिश्रम घेतले.