सुट्टीच्या दिवशी उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सुरु

36
सुट्टीच्या दिवशी उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सुरु
चंद्रपूर, दि. 10 मार्च : मार्च महिन्याच्या अखेरीस नवीन वाहनांची मोठ्या प्रमाणात खरेदी होण्याची शक्यता असल्यान व अशा नवीन वाहनांना नोंदणी क्रमांक मिळून जनतेला वाहनाचा तातडीने ताबा मिळावा तसेच या अनुषंगाने शासकीय महसूल जमा व्हावा, याकरिता मार्च महिण्यातील सर्व सुट्टीच्या दिवशी उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सुरु ठेवण्यात येत आहे.
या दिवशी वाहन नोंदणी व त्या अनुषंगाने कर वसुलीचे कामकाज सुरु ठेवण्यात येत असून याचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, चंद्रपूर तर्फे कळविण्यात आले आहे.