नागरिकांनी उपजिल्हा रूग्णालयात नोंदणी करून कोविशील्ड लस घ्यावी.असे आवाहन मूल नगरपरीषदेचे मुख्याधिकारी सिध्दार्थ मेश्राम

51

मुल मध्ये कोविशील्ड लसीकरण मोहिमेला प्रारंभ
मूल:- येथील ग्रामिण उपजिल्हा रुग्णालयात  45 वर्षावरील नागरिकांना कोविशील्ड लसीकरणाची मोहीम  मार्च पासून सुरू करण्यात आली असून नगर परिषद मुल च्या सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा,असे आवाहन मूल नगरपरीषदेचे मुख्याधिकारी सिध्दार्थ मेश्राम यांनी केले आहे.

मागील महिन्यापासूनच कोविशील्ड लसीकरणाला सुरूवात झाली आहे. पहिल्या टप्यात  आरोग्य विभाग कर्मचा-यांनी लसीकरणाचा लाभ घेतला.दुस.या टप्प्यातील कोरोना थांबविण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेत कोरोना चा प्रसार थांबवणे , लसीकरण करुन घेणे पहिल्या बाबीसाठी सर्वांनी लक्षण दिसताच तपासणी करणे, मास्क ,सामाजिक अंतर व वारंवार हात धुणे. याकडे लक्ष द्यावे  जास्त संपर्कात असणा.यांनी त्वरित तपासणी करुन घ्यावी. कुछ नही होता ही भूमिका सोडुन द्यावी.तसेच आपल्याकडे १ मार्च पासुन ६० वर्ष वयापेक्षा अधिक व ४५ वर्ष वयापेक्षा अधिक गंभिरध्दिर्घ आजार असणा.यांची नोंदणी करुन लसिकरणाकरिता सुरुवात झाली आहे.त्यादृष्टीने कोणताही गैरसमज न ठेवता ग्रामिण उपजिल्हा रुग्णालयात जाऊन लसिकरण करुन घ्यावे.आपली सर्वांची साथ  तरच होईल कोरोना वर मात  सदर नोंदणी ही मोफत असून संबंधित संकेतस्थळावर नोंदणी करूनलसीकरण दिनांक व केंद्राची निवड करता येईल.
त्यासाठी मोबाईल क्रमांक आधार किंवा विहित ओळखपत्र ज्यावर ओळखपत्रक्रमांक असेल तर आॅनलाईन नोंदणीच्या वेळी सदर करायचे आहे. तरी 45वर्षावरील नागरिकांनी लसीकरणाचा लाभ घ्यावा असे आवाहन नगरपरीषदेचेमुख्याधिकारी सिध्दार्थ मेश्राम यांनी केले आहे.