Driving License आणि RCसाठी घालाव्या लागणार नाहीत आरटीओमध्ये चकरा, सेवा होणार ऑनलाईन

42

नवी दिल्ली: रस्ता परिवहन आणि राजमार्ग मंत्रालयाकडून (Road Transport and Highway Ministry) वाहन चालक परवाना (driving license) आणि सर्टिफिकेट ऑफ रजिस्ट्रेशन (Certificate of Registration) सेवा पूर्णपणे ऑनलाईन (online) करण्यात आल्या आहेत ज्यामुळे लोकांना आरटीओच्या (RTO) चकरा माराव्या लागणार नाहीत. आधार ऑथेंटिकेशनच्या (Aadhar authentication) माध्यमातून आता या सुविधांचा लाभ घेता येणार आहे. या सेवा आता पूर्णपणे संपर्करहित (contactless) झाल्या आहेत ज्यामुळे आपला वेळ वाचेल आणि कोरोना संक्रमणापासून (corona infection) वाचण्यासाठीही मदत होईल

गर्दीमुळे वाट पाहण्याची गरज आता नाही

वाहन चालकाचा परवाना आणि सर्टिफिकेट ऑफ रजिस्ट्रेशन घेण्यासाठी दररोज हजारो लोक आरटीओमध्ये येतात. अनेकदा ही गर्दी इतकी असते की लोकांना तासनतास वाट पाहावी लागते. तसेच गर्दीमुळे कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोकाही असतो. अशा परिस्थितीत लोकांना आता घरबसल्या या सेवांचा ऑनलाईन लाभ घेता येणार आहे. आरटीओशी संबंधित 18 सेवा आता ऑनलाईन करण्यात आल्या आहेत ज्यामुळे आरटीओत येणाऱ्या लोकांची संख्या कमीत कमी राखली जाईल.

जाणून घ्या कोणत्या आहेत या सेवा

या सेवांमध्ये आता रजिस्ट्रेशन सर्टिफिकेटचा पत्ता बदलण्याचा आर्ज, मान्यताप्राप्त ड्रायव्हिंग ट्रेनिंग सेंटरकडून ड्रायव्हिंग परवान्यासाठीचा अर्ज, अधिकाऱ्यांकडे वाहनाच्या नोंदणीसाठीचा अर्ज, अधिकाऱ्यांकडे वाहनासाठी नव्या नोंदणी चिन्हासाठी अर्ज, भाडे-खरेदी किंवा करार, डुप्लिकेट रजिस्ट्रेशनसाठी अर्ज, रजिस्ट्रेशन सर्टिफिकेटसाठी NOCसाठी अर्ज या सर्व सेवा सामील करण्यात आल्या आहेत.

कागदपत्रे न देता घ्या या सुविधांचा लाभ

महत्वाची गोष्ट अशी की ऑनलाईन चालू करण्यात आलेल्या या सर्व सुविधांचा लाभ घेण्यासाठी आपल्याला कोणतीही कागदपत्रे देण्याची गरज पडणार नाही. आपल्याला फक्त parivahan.gov.in या संकेतस्थळावर जाऊन आपला आधारक्रमांक घालावा लागेल आणि याचे व्हेरिफिकेशन करावे लागेल. एकदा आधारकार्डाचे व्हेरिफिकेशन झाल्यानंतर आपल्याला या 18 सेवांचा लाभ घेता येईल. त्यामुळे आता आपल्याला या कामांसाठी आरटीओला चकरा माराव्या लागणार नाहीत.