यूजीसी-नेट परीक्षा अर्जास मुदतवाढ

70

पुणे – वरिष्ठ महाविद्यालयात सहायक प्राध्यापकांसाठी अनिवार्य असलेल्या यूजीसी-नेट परीक्षेसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. आता 9 मार्चपर्यंत अर्ज करता येणार आहे.

नॅशनल टेस्टिंग एजन्सीद्वारे (एनटीए) यूजीसी-नेट परीक्षा घेतली जाते. यापूर्वी नेट परीक्षेसाठी 2 फेब्रुवारी ते 2 मार्च अशी मुदत होती. दोन दिवसांपूर्वी मुदत संपल्याने काही उमेदवारांना अर्ज भरता आले नाही. दरम्यान, यूजीसी-नेट परीक्षा मेमध्ये होणार आहे. त्याच्या तारखाही जाहीर झाल्या आहेत.

दरम्यान, उमेदवारांना परीक्षेचे शुल्क भरण्यासाठी दि. 10 मार्चपर्यंत मुदत आहे. तसेच काही उमेदवारांना अर्जात दुरुस्ती करावयाची असेल, त्यासाठी 12 ते 16 मार्चदरम्यान लिंक खुली करण्यात येणार आहे. या परीक्षेसंबंधी कोणतीही माहिती किंवा मदतीसाठी एनटीएचे मदत केंद्र अथवा मेलद्वारे संपर्क करू शकता, असे आवाहन ‘एनटीए’ने स्पष्ट केले आहे.