दारूड्या भावाचा केला लहान भावाने घात मूल हद्दीतील केळझर येथील घटना

34

मूल:-  तालुक्यातील केळझर येथे  दारूडया भावाशी झालेल्या मारहाणीत लहान भावाकडून मोठया भावाचा घात झाल्याची घटना तालुक्यातील केळझर येथे काल घडली. पोलीस स्टेशन मूल हद्दीतील केळझर येथील सुनिल राजाराम मानकर (40) हयाला दारूचे व्यसन, दररोज दारू पिवुन घरी येणे व आई व भावाला शिवीगाळ करून मारहाण करणे, हे त्याचे नित्याचे काम काल 2 मार्च रोजी संध्याकाळी 6 वाजताचे सुमारास नेहमी प्रमाणे सुनिल मानकर हा दारू पिवून घरी गेला, कारण नसतांना वाद उकरून काढून आईला शिवीगाळ करू लागला. दरम्यान घरी असलेला लहान भाऊ सुभाष राजाम मानकर (38) याने मोठा भाऊ सुनिल याला विनाकारण शिवीगाळ करू नको असे समजावत खोली बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, त्या कारणावरून सुनिल आणि सुभाष मध्यें शाब्दीक वाद झाला. शाब्दीक वाद विकोपाला जाऊन हातघाईवर पोहोचला, दरम्यान मोठा भाऊ सुनिल याने लहान भाऊ सुभाषला जिवंत मारतो असे म्हणत घरात ठेवलेली लोखंडी सळाख हातात घेतली. सळाख घेवुन सुभाष वर वार करण्याचा प्रयत्न करीत असतांना सुभाषने सुनिलचा प्रतिकार केला. सुनिलच्या हातामधुन सळाख खेचत असतांना झालेल्या झटापटीत राग अनावर झालेल्या सुभाषने सुनिलच्या हातातल्या सळाखाीने सुनिललाच मारहाण केली. परीणामी दारूडा सुनिल जागीच गतप्राण झाला. सदर घटनेची माहिती मूल पोलीसांना होताच ठाणेदार सतिशसिंह राजपुत आणि सहायक पोलीस निरीक्षक मनोज गदादे सहका-यांसह केळझर येथील घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळाच्या प्रत्यक्ष पाहणी नंतर आई गिरीजाबाई मानकर (60) हीच्या फिर्यादीवरून घटनेची नोंद घेवून लहान भाऊ सुभाष याला ताब्यात घेतले. तपासाअंती सुभाष मानकर याला मोठया भावाची हत्या केल्याचे कारणावरून अटक केली. पुढील तपास ठाणेदार सतिशसिंह राजपुत यांचे मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक मनोज गदादे सहकारी गिरीश नागापुरे याच्या सहकार्याने करीत आहे.