आरटीई प्रवेश 3 मार्च पासून सुरू पालकांनी आपल्या पाल्यांची आॅनलाईन नोंदणी करायची आहे.

43

आरटीईच्या प्रवेशाला होणार सुरूवात: सन 2021-22 करिता होणार प्रवेश
गोरगरिबांच्या मुलांचा होणार आरटीई प्रवेश 3 मार्च पासून सुरू
मूल:- बालकाचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 अन्वये
वंचित व दुर्बल घटकातील बालकांकरिता इंग्रजी माध्यम,विना अनुदानित,कायम विना अनुदानित,स्वयंअर्थसहायित शाळामध्ये
25टक्के मोफत प्रवेशाची तरतूद करण्यात आली आहे.
3मार्च ते 21 मार्च 2021 या कालावधीत सन 2021-22 या शैक्षणिक वर्षाकरीता
प्रवेश प्रक्रिया घेण्यात येत आहे.पालकांना या संकेतस्थळावर अर्ज करावयाचे आहे कागदपत्रांची पूर्तता करून घ्यावी.अर्ज भरतानायोग्य ती काळजी घ्यावी.निवासी ठिकाणचे आॅनलाईन मॅपिंग करताना ते अचूकतेची खात्री करूनच आॅनलाईन अर्ज स्वप्रमाणित करून अंतिम करावे.
दिलेल्या मुदतीत पालकांनी आपल्या पाल्यांची आॅनलाईन नोंदणी करायची आहे.
मुलांना मोफत प्रवेश मिळणार आहे. 1आॅक्टोबर 2014 ते 31 डिसेंबर 2015 या कालावधीच्या
दरम्यान जन्मलेली बालके आॅनलाईन प्रवेश नोंदणीकरिता पात्र राहणार आहेत.
ही लागणार कागदपत्रे:- जन्माचे प्रमाणपत्र व वास्तवाच्या पुरावा सर्व घटकांना
आवश्यक ,सामाजिक वंचित घटकातील पालकांचा जातीचा दाखला,अनिवार्य,
आर्थीक दुर्बल घटकातील पालकांचा 1 लाखापेक्षा कमी उत्पन्न असलेला उत्पन्नाचा
दाखला,दिव्यंाग विद्याथ्र्याकरिता 40 टक्केपेक्षा जास्त अपंगत्वाचे प्रमाणपत्र,पाल्य व पालक
यांचे आधार कार्ड जमा करावे.