Aadhaarला दिलेला मोबाईल नंबर विसरलात? ‘ही’ पद्धत वापरा, नाही राहणार OTPचं टेंशन

109

Aadhar Card : सध्याच्या काळात आधार कार्ड हे खुप महत्वाचे डॉक्युमेंट आहे. कोणत्याही सुविधेचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड अत्यंत आवश्यक असते. देशातील कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड खुप गरजेचे ठरते. तसेच इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करण्यासाठीही तुमच्याकडे आधार कार्ड असणे आवश्यक असते.

आधार कार्ड तुमच्या मोबाईल नंबरसोबत लिंक असणे आवश्यक आहे. कारण, जेव्हा तुम्ही आपल्या आधारकार्डच्या साहाय्याने कोणतेही काम करायला जाता तेव्हा त्याच्या व्हेरीफिकेशनसाठी एक OTP येतो. हा OTP आपल्या रजिस्टर्ड मोबाईल नंबर किंवा ईमेल आईडीवर येतो.

जर तुमचा मोबाईल नंबर बदलला असेल तर तो आधार व्हॅलिडेट करण्यासाठी येणारा OTP हा तुमच्या जुन्या नंंबरवर जातो. अशात जर तुम्हाला OTPव्हेरीफिकेशनच्या मदतीने कोणती प्रक्रिया पूर्ण करायची आहे. तर तुम्हाला ही प्रक्रिया पूर्ण करता येणार नाही. तसेच तुम्हाला mAadhaar या एॅपचा वापर करायचा असेल, तर त्यासाठी देखील तुमचा मोबाईल नंबर आधार कार्डशी लिंक असणे आवश्यक आहे.

आधार कार्ड मध्ये नवीन नंबर असा करा अपडेट
– सर्वात पहिल्यांदा आधार कार्ड नोंदणी केंद्रावर जा.
– आता येथून मोबाईल नंबर लिंक करण्यासाठी एक फॉर्म घ्या. या फॉर्मला आधार करेक्शन फॉर्म म्हणतात.
– या फॉर्म मध्ये योग्य माहिती भरा.
– हा भरलेला फॉर्म 25 रुपयाच्या शुल्क सोबत जमा करा.
– फॉर्म जमा केल्यानंतर तुम्हाला याची पावती दिली जाईल.
– या पावती मध्ये अपडेट रिक्वेस्ट नंबर असेल.
– या रिक्वेस्ट नंबर वरुन तुम्ही हे चेक करु शकता की, नवीन नंबर आधारकार्डसोबत लिंक झाला आहे की नाही.
– तीन महिन्यात तुमचा नवीन नंबर लिंक केला जाईल.
– जेव्हा तुमचा नवीन नंंबर आधार कार्ड सोबत लिंक होईल तेव्हा, तुमच्या त्याच नंबरवर OTP येइल.
– तुम्ही आधार कार्ड सोबत नवीन मोबाईल नंबर लिंक करण्याचे स्टेटस UIDAI च्या टोल फ्री नंबर 1947 वर कॉल करु माहिती घेवू शकता.

पीवीसी कार्ड साठी अर्ज करण्याची पद्धत –
UIDAI ने पीवीसी कार्ड सारखे आधार कार्ड लॉंन्च केले आहे. हे कोणताही आधार कार्ड धारक 50 रुपयांच्या शुल्कमध्ये बनवून घेवू शकतो. यासाठी सर्वात प्रथम UIDAI च्याअधिकृत वेबसाइट https://uidai.gov.in वर जा. त्यानंतर My Aadhaar Section मध्ये Order Aadhaar PVC Card वर क्लिक करा. जसे ही तुम्ही Order Aadhaar PVC Card वर क्लिक कराल, तुम्हाला 12 अंकाचा आधार क्रमांक किंवा 16 अंकाचा व्हर्चुअल आयडी किंवा 28 अंकाचाEID नोंद करावा लागेल. या तीनपैकी कोणताही एक टाका.