चांदापूर येथे शिवजन्मोत्सव कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला

46

मूल:- तालुक्यातील चांदापूर येथे   १९ फेब्रुवारी २०२१ रोज शुकवार ला झेंडा चौक चांदापूर येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्य शिवगर्जना सांस्कृतिक कला , क्रीडा व बहुउद्देशीय मंडळ चांदापूरच्या सौजन्याने शिवजन्मोत्सव कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला व विविध स्पर्धाचे आयोजन करण्यात आले . त्यामध्ये इयत्ता १ली व २री च्या विद्यार्थ्यांची चित्रकला स्पर्धा घेण्यात आली या स्पर्धेत वेदांत दिनकर झरकर चा प्रथम क्रमांक व श्रेयस शेषराव पाल चा दुसरा क्रमांक आला . इयत्ता ३ री व ४ च्या विदयार्थ्यांची चित्रकला स्पर्धा घेण्यात आली . या स्पर्धेत साई संजय चल्लावार याचा पहिला क्रमांक तर संकल्प शामराव कारमवार चा दुसरा क्रमांक आला .

 

इयत्ता ५ वी ते ७ वी आणि इयत्ता ८ वी ते १०वी च्या विद्यार्थ्यांची वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली यामध्ये अ गटातील कु . खुशबु दिलीप ठाकुर चा प्रथम क्रमांक व कु . अंजली चंद्रकांत चिंचोलकर चा दुसरा क्रमांक तर ब गटातील कु . प्रतिक्षा किसनदास कडूकार चा प्रथम क्रमांक व कु . सलोनी अमोल गुलभमवार चा दुसरा क्रमांक आला .

खुली गीतगायन स्पर्धा घेण्यात आली यामध्ये धनंजय सुनिल कमनपेलीवार चा प्रथम व कु .पल्लवी विलास झरकर आणि धिरज दिलीप पाल या दोघांचा दुसरा क्रमांक आला . सर्व विजेत्या स्पर्धकांचे रक्तदात्यांच्या हस्ते सन्मानचिन्ह , मेडल देऊन गौरव करण्यात आला .व सर्व सहभागी विध्यार्थ्याना प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला . स्पर्धांचे परिक्षक म्हणून मुख्या . सुनिता चल्लावार मॅडम, श्री . रमेश डोंगरवार सर, श्री .नंदकिशोर शेरकी सर, श्री .विनोद कोहपरे सर, व श्री . सुनिल निमगडे सर उपस्थित होते .

इयत्ता १ ली ते ८ वी च्या सर्व विद्यार्थ्यांना थोर महापुरुषांचे पुस्तक वितरण करण्यात आले . या वेळेस विविध स्पर्धांचे सुत्रसंचलन नवनित चिंचोलकर, वसंत पोटे, अभिजित चिंचोलकर, अंकुश शेरकी, पंकज निशाने यांनी केले . तर प्रास्ताविक नंदकिशोर शेरकी यांनी केले . दिलीप पाल, खुशाल शेरकी, राजु पोटे, रवि शेरकी, विनोद कोहपरे यांनी मार्गदर्शन केल तर प्राध्या .सौ . शिल्पा चांगदेव चिंचोलकर यांनी कार्यक्रमाचे महत्व पटवून दिले . या कार्यक्रमासाठी देविदास देशमुख, सुरेश देशमुख, धर्मेंद्र घोगरे, पत्रु पाल, दिलीप पोटे, गोकुळ तिवाडे, व शिवगर्जना मंडळाचे सर्व सदस्य , चांदापूर येथील प्रतिष्ठीत नागरीक,युवक, युवती, महिला आणि बालगोपाल उपस्थित होते .
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गुरदेव सेवा मंडळ चांदापूर, आदर्श बहुउद्देशीय मंडळ चांदापूर, संत तुकाराम महाराज प्रतिष्ठान व सर्व युवकांनी सहकार्य केले .