कृषी योजनासाठी शेतक-यांनी कागदपत्र अपलोड करावे. -प्रमोद मशाखेत्री

48

कृषी योजनासाठी शेतक-यांनी कागदपत्र अपलोड करावे. -प्रमोद मशाखेत्री

मूल:- कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ देण्यासाठी यावर्षी महाडीबीटी पोर्टल
मार्फत शेतक-यांचे अर्ज मागविले होते. त्यानुसार आता अर्ज केलेल्या शेतक-यांची आयुक्ता
स्तरावरून यांत्रिकीकरण व विविध योजनेची आॅनलाईन लाॅटरी निघाली असून ज्या शेतक-यांना
कृषी विभागाच्या योजनेचा एसएमएस आला आहे,अशा शेतक-यानी आता महाडिबीटी महाआयटी
पोर्टलच्या संकेतस्थळावर जाऊन आपली आवश्यक ती कागदपत्रे अपलोड करण्याचे आवाहन सामाजीक कार्यकर्ता प्रमोद मशाखेत्री यांनी केले आहे.
शेतक-यांनी सेवा सुविधा केंद्र तसेच सार्वजनिक सुविधा केंद्रातून महाडीबीटी संकेतस्थळावर जाऊन
आपला सातबारा,आठ अ,आधार कार्ड,बॅंक पासबुक,टेस्ट रिपोर्ट,टॅªक्टरचलित चंत्र असल्यास आरसी बुक
संकेतस्थळावर अपलोड करावे.
आॅनलाईन लाॅटरी पध्दतीने शेतक-यांना कृषी यांत्रिकीकरण अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती साठी
नवीन विहीर,कांदाचाळ,प्लॅस्टिक मल्चिंग,सूक्ष्म सिंचनविषयक योजनांचा समावेश केला आहे. शेतक-यांनी महाडीबीटी महाआयटी या संकेतस्थळावर जाऊ
शेतकरी योजना यावर क्लिक करून वापरकर्ता आयडीवर क्लिक करून वापरकर्ता आयडी व पासवर्ड व त्याखालील
प्रतिमेत दर्शविलेल्या शब्दावरून लाॅगिनवर क्लिक केल्यास प्रोफाईल स्थिती पुष्ठावर क्लिक करून त्यानंतर अॅप्लाईड
घटकामध्ये छाननीअंतर्गत अर्ज या पर्यायावर क्लिक केल्यास अपलोड डाॅक्यूमेंन्ट अंडर स्कूटीनी असा शेरा ज्या
घटकासमोर असेल त्या घटकासाठी लाॅटरीव्दारे आपली निवड झाली आहे. असे समजावे.