मूल बसस्थानक परिसरात प्रवाशांची प्रचंड गैरसोय

34

मूल :— येथील बसस्थानकात पिण्याचे पाणी मिळत नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. याकडे दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे. मूल बस स्थानकात दिवसभर प्रवाशांची रेलचेल असते.नागपूर,गडचिरोली,ब्रम्हपूरी,चंद्रपूर,चिरोली,ताडाळा,जूनासूर्ला तसेच मारोडा मार्गे प्रवाशांना याच बस स्थानकातून जावे लागते. आता दुपारी चांगलेच ऊन पडत असल्याने प्रवासी आपली तहान भागविण्याकरीता बस स्थानकावर पिण्याचे पाणी शोधतात. काही बसमधील प्रवासी स्थानकावर बस थांबताच नळावर आपली बॉटल भरण्याकरीता जातात. परंतु,त्या ठिकाणी नळाला पाणीच नसल्याने त्यांची निराशा होताना दिसत आहे.

     बस स्थानकावर वॉटर फिल्टर बंद आहे. खेडयांतून अनेक वृध्द प्रवासी येतात. आता शाळाही सुरू झाल्याने विद्याथ्र्यांनाही पिण्याचे पाणी मिळत नाही. आगार व्यवस्थापकांनी याकडे लक्ष देऊन प्रवाशांची गैरसोय टाळावी आणि त्यांना पिण्याचे स्वच्छ शुध्द पाणी उपलब्ध करून द्यावी,अशी मागणी प्रवासी करीत आहेत.