२० फेब्रुवारी रोजी मूल येथे कर्मवीर कन्नमवार सभागृहात करीअर मार्गदर्शन

30

मूल : करीयरच्या बाबतीत संभ्रमात असलेल्या विद्यार्थ्यांना करीयरच्या निवडीसाठी दिल्या जाणाऱ्या विविध स्पर्धा परिक्षा आणि त्याचा अभ्यासक्रम व प्रश्नांची माहिती व्हावी, या उद्देशाने २० फेब्रुवारी रोजी स्थानिक कर्मवीर कन्नमवार सभागृहात करीअर मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात डॉ. पूर्वा तारे इयत्ता नववी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना करीअर निवडीबाबत मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी नगराध्यक्षा रत्नमाला भोयर प्रामुख्याने उपस्थित राहणार असून, या कार्यक्रमात मूलचे उपविभागीय पोलीस अधिकारी अनुज तारे हे युपीएससी व एमपीएससीसोबतच इतर स्पर्धा परिक्षांबाबत मार्गदर्शन करणार आहेत. यात सहभागी होण्यासाठी शुल्क आकारण्यात येणार असून एका विद्याथ्र्यासोबत एका पालकाला विनामूल्य प्रवेश दिला जाणार आहे. सहभागासाठी विद्यार्थ्यांनी डॉ. पूर्वा तारे यांचेशी संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.