ज्येष्ठांना मिळाणार स्मार्ट कार्ड खाजगी एजंट नोंदणी मूल्य 70 रूपये वेळ :— सकाळी 9ते साय 5 पर्यंत

29

ज्येष्ठांना मिळाणार स्मार्ट कार्ड खाजगी एजंट नोंदणी मूल्य 70 रूपये वेळ :— सकाळी 9ते साय 5 पर्यंत
मूल :— राज्य परिवहन महामंडळाने जेष्ठ नागरिकांना ‘स्मार्ट कार्ड’ देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ज्येष्ठांची प्रवासादरम्यान मतदान कार्ड,आधारकार्डापासुन सुटका होणार असून,त्यांच्या हाती स्मार्ट कार्ड येणार आहे. विशेष म्हणजे,या स्मार्ट कार्डला रिजार्च केले तर प्रवाशांना दरम्यान पैसेहीबाळगण्याची गरज राहणार नाही.
सुरक्षित प्रवास म्हणून अनेकजण बसव्दारे प्रवास करण्याला पसंती देतात. त्यात राज्य परिवहन महामंडळाच्या बसव्दारे प्रवास करताना ज्येष्ठांना तिकिटाच्या दरात सवलत देण्यात आली आहे. त्यामुळे शहरी,ग्रामीण भागातील ज्येष्ठ नागरिकांचा बसव्दारे प्रवास करण्याकडे अधिक कल असतो. स्मार्ट कार्ड तयार करण्यासाठी ज्येष्ठांाना 50,  70 रूपये शुल्क आकारण्यात आले आहे.
आॅनलाईन नोंदणीनंतर त्यास आधार कार्डशी लिंक करण्यात येत आहे. त्यांनतर 10 ते 15 दिवसात संबंधिताना स्मार्ट कार्ड आगरातर्फे देण्यात येत आहे.

        यामुळे ज्येष्ठ नागरिकांनी कोठे व किती किलोमीटरचा प्रवास केला,याची माहिती एका क्लिकवर महामंडळाकडे उपलब्ध होणार आहे.यापूर्वी ज्येष्ठांसाठी अध्र्या तिकीट दरावर 4हजार किलोमीटर प्रवासाची मर्यादी होती.मात्र,केवळ मतदान कार्ड,आधार कार्ड,पाहून प्रवाशांना तिकिट दिली जात होती.कोणी किती प्रवास केला,याची माहिती महामंडळाला मिळू शकत नव्हती.मात्र आता ज्येष्ठ नागरिकांना स्मार्ट कार्ड मशिनव्दारे स्वाईप करून प्रवास केल्यानंतर किलोमिटरची माहिती महामंडळाकउे संकलित होणार आहे. वर्षाच्या आत 4 हाजर किलोमीटरची मर्यादा संपली तर मात्र संबंधित ज्येष्ठ नागरिकाला तिकिटाचा पूर्ण दर देऊन प्रवास करावा लागणार आहे.