15 फेब्रुवारी रोजी ‘महिला लोकशाही दिन’

29
15 फेब्रुवारी रोजी ‘महिला लोकशाही दिन’
चंद्रपूर, दि. 12 फेब्रुवारी : माहे फेब्रुवारी महिन्याचा तिसरा सोमवार दिनांक 15 फेब्रुवारी 2021 रोजी ‘महिला लोकशाही दिनाचे’ आयोजन स. 11 ते दु. 1 वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयाचे सभागृहात आयोजित करण्यात आले आहे.
सदर महिला लोकशाही दिनी न्याय प्रविष्ठ प्रकरणे, सेवाविषयक आस्थापने प्रकरणे वगळून इतर वैयक्तीक स्वरुपाचे तक्रार/ निवेदन स्विकारण्यात येतील. तसेच जिल्हास्तरीय तक्रार अर्ज व तालुकास्तरावरील अपीलीय अर्ज स्विकारण्यात येतील, असे जिल्हा माहिला व बाल विकास अधिकारी यांनी कळविले आहे.