मूल येथील विहारात रमाई जयंती

34

मूल : येथील वॉर्ड न. १५ उपजिल्हा रुग्णालय मागील बौद्धविहारात माता रमाई जयंती कार्यक्रम साजरा करण्यात आला.भारतीय बौद्ध महासभा चंद्रपूर तालुका शाखा मूल शहर, बौद्ध समाज समिती व रमाबाई महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षतेखाली सामाजिक कार्यकर्त्या बबिता गेडेकर होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. पूर्वा अनुज तारे, सीमा लोनबले, भारती कांबळे, कल्पिता भडके, रमाई माता मंडळाच्या अध्यक्ष तथा नगरसेविका वंदना वाकडे, जीवन बन्सोड, भारतीय बौद्ध महासभा शहर उपाध्यक्ष संस्कार सिद्धार्थ बांबोडकर, भारतीय बौद्ध महासभा शहर उपाध्यक्ष हिरालाल भडके, नितीन निमगडे, मधुकर बनकर उपस्थित होते. कोरोनाच्या काळात डॉ. पूर्वा तारे यांनी रुग्णांची केलेली सेवा बघता त्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. संचालन मंदा गेडाम, प्रास्ताविक वंदना वाकडे तर आभार सरला रंगारी यांनी मानले.