पंचायतराज समितीच्या पाहणी दौऱ्यात ‘सिलेंडर स्पोट’ ही अफवा मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांचा खुलासा

57
पंचायतराज समितीच्या पाहणी दौऱ्यात ‘सिलेंडर स्पोट’ ही अफवा
मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांचा खुलासा
चंद्रपूर, दि. 10 फेब्रुवारी : सोशल मीडिया व प्रसार माध्यमांद्वारे पंचायतराज समितीच्या पाहणी दौऱ्यात गोंडपिपरी तालुक्यातील आक्सापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात सिलेंडरचा स्पोट झाल्याची अफवा काही ठिकाणी पसरत आहे. याबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांनी खुलासा केला आहे की सदर दौऱ्याप्रसंगी ऑक्सीजन सिलेंडरच्या पाहणीप्रसंगी सिलेंडर ओपण (हाताळणी) करतांना आवाज झाला आहे, मात्र कोणताही स्पोट झालेला नाही, तसेच कोणीही सदस्य जखमी झालेले नाही. याविषयी चुकीचे वृत्तांकनातून अफवा पसरू नये, याबाबत दक्षता घेण्याचे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे.