वाहन चालविताना मोबाइलवर हॅलो …………

42

वाहन चालविताना मोबाइलवर बोलण्याची वाढली के्झ

मूल:- केाणतेही वाहन चालविताना मोबाइलवर बोलणे किंवा संभाषण करणे कायद्याने गुन्हा असला तरीही तरूणामध्ये दुचाकी गाडी चालविताना मोबाईलवर बोलण्याची क्रेझ हॅलो वाढल्याचे निदर्शनास येत आहे. तरूण वर्ग या प्रकाराला स्टाइल समजत असले तरी यापासून घातपाताचा धोका निश्चित आहे. अशा वाहनचालकांवर वेळीच पोलिसांनी कडक कारवाई करणे अपेक्षित आहे.वाहन चालविण्यासाठी कायद्याने काही दुर्लक्ष करून सध्या दुचाकी गाडी चालविणा-या तरूण वर्गामध्ये मोबाइलवरसंभाषण करण्याच्या सवयी वाढल्या आहेत.या बोलण्याला तरूण वर्ग स्टाइल समजत आहेत. ही स्टाइल मृगजळासारखी असून,कोणत्या बाजूने वाहन येईल,याची काही निश्चितता राहत नाही. असे प्रकार कित्येकदा पोलिसांच्या नजरेसमोरही घडत असतात.परंतु त्याची थातुरमातुर कारवाई केव्हाही जीव घेणे ठरू शकते.हा प्रकार थांबविण्यासाठी वाढत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
पोलिसांनी योग्य पध्दतीने कारवाई केल्यास निदान अपघात होण्यापासून टाळले जावू शकते. तरूण वर्गामध्ये स्मार्ट फोन वापरून स्मार्ट होणे चांगली बाब असली तरीही अपडेट महितीसाठी फक्त त्याचा वापर होणे गरजेचे आहे. त्याचा दुरूपयोग करून अपघाताला आमंत्रण देण्यात काही उपयोग नाही. ही भावना तरूण मंडळीच्या मनात रस्ता सुरक्षा सप्ताहानिमित्याने रूजविणे गरजेचे आहे. असे झाले नाही तर गाडी चालविणे आणि मोबाइलवर बोलणे जीवघेणे ठरल्याशिवाय राहणार नाही.सुरू असलेल्या रस्ता सुरक्षा पंधरवडयादरम्यान पोलिसांकडून समुपदेशन झाल्यास फायद्याचे ठरेल,असे वाटते.