फोटोग्राफी व्यवसायास अवैध व्यवसाय करणाऱ्या लोकाकडून वाचवावे  मूल तालुका फोटोग्राफी संघटनेची मागणी              

40

 

मूल तालुका फोटोग्राफी संघटनेची मागणी
संवर्ग विकास अधिकारी यांना दिले निवेदन
मूल :-   मार्च पासुन सुरू असलेल्या कोरोना विषाणुच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर कित्येक महिने फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफीचे व्यवसाय बंद स्थितीत होते . केंद्र आणि राज्य शासनाने घोषीत केलेल्या लॉकडाउनचे पालन या व्यवसाईकांनी केले  मात्र एप्रिल – मे महिण्यात भरभराटीच्या व्यवसायाच्या काळात कोरोना प्रकोपात इतर व्यवसाया सोबत हा व्यवसाय असल्याने बिकट परिस्थीतीचा सामना करावा लागला आहे . त्यासोबतच आम्हाला अवैधरित्या फोटो काढुन अनाधिकृतपने प्रिंट काढून देणारे  नेटकॉफे , झेराक्स सेंटर , ऑनलाईन सेंटर, रोजगार सेवक  तसेच ग्रामपंचायत मधिल कॉपूटर ऑपरेटर इत्यादी व्दारे अवैधरीत्या फोटो काढणे सुरु केले आहे.  या फोटोग्राफी व्यवसाच्या मिळकतीवर परिवाराचा उदरनिर्वाह चालतो . कोविड १९ मुळे आमच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.
दुकानाचे भाडे देणेदेखिल कठीण झाले असुन सर्व फोटो स्टुडिओ धारकांचे समान दर असतांना झेराक्स सेंटर , नेटकॅफे , ऑनलाईन सेंटरचे संचालक  बेभावाने ग्राहकांचे फोटो काढून देतात.  तसेच शासकिय वेतन घेणारे नोकरदार वर्ग, रोजगार सेवक व ग्रामपंचायत मधील डाटा एन्टी ऑफरेटर यांना शासकिय कामासाठी नियुक्त केले असुन ते ग्राहकांचे फोटो काढून देतात. सध्या जॉब कार्डचे फोटो काढणे सुरु असुन परस्थिती अशीच  राहीली  तर आमचा व्यवसाय बंद पडल्याशिवाय  राहणार नाही.आम्ही मोठे भाडवल उभारुन व गुंतवणूक करून फोटो स्टुडिओ व्यवसाय सुरु केला आहे . अवैध फोटोग्राफी व्यवसायामुळे आमच्या स्टुडिओ व्यवसायावर आर्थिक संकट निर्माण झाले आहे.  ज्या व्यवसाया करिता नोंदणी केली तोच व्यवसाय करणे बंधनकारक करण्यास आपण लक्ष देऊन भाग पाडावे अशी विनंती   मुल तालुका छायाचित्रकार संघटना यांनी   जिल्हाधिकारी  चंद्रपूर, मुख्य कार्यपालन अधिकारी  चंद्रपूर  ,
उप विभागीय अधिकारी मुल व संवर्ग विकास अधिकारी मूल यांना निवेदनाद्वारे केली आहे.