प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे शिबीर

35

प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे शिबीर
वरोरा, चिमुर,ब्रम्हपुरी व गडचांदूर येथील नागरिकांनी लाभ घ्यावा

चंद्रपूर, दि.4 फेब्रुवारी : उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे वरोरा, चिमुर, ब्रम्हपुरी व गडचांदूर या तालुक्याच्या ठिकाणी शिकाऊ अनुज्ञप्ती, पक्क्या अनुज्ञप्ती, तसेच वाहनाची नोंदणी इत्यादी कामांकरिता माहे फेब्रुवारी महिन्यातील एक दिवसीय शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
परिवहन विभागाच्या वेळापत्रकानुसार आनंदनिकेतन महाविद्यालय, आनंदवन, वरोरा येथे दिनांक 5 फेब्रुवारी, शरद पवार महाविद्यालय, गडचांदुर येथे दिनांक 18 फेब्रुवारी, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, चिमुर येथे 21 फेब्रुवारी, एन.एच. महाविद्यालय, ब्रम्हपुरी येथे दिनांक 27 फेब्रुवारी 2021 रोजी शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. तरी इच्छुक नागरिकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे यांनी केले आहे.