मूल येथे संत तुकाराम महाराज जयंती

27

मूल :-        विश्व  वंदनीय जगतगुरु संत तुकाराम महाराज जयंती   निमित्याने कन्नमवार सभागृह मूल येथे कार्यक्रम आयोजित केला होता. कार्यक्रमाला  प्रबोधनकार धनराज महाराज नागपुरे मुरखडा तसेच प्रमुख वक्ते म्हणून श्री प्रणय चुदरी नवेगाव, व त्याचे सर्व वारकरी उपस्थित होते. प्रवचन सह  समूह नृत्य, समूह अभंग, तसेच गीत गायन, असे कार्यक्रम  मुलींनी तथा महिलांनी अगदी उत्साहात पार पाडले.  कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लाभलेले  श्री मानीकराव जगताप, उद्घाटक म्हणुन नामदेवराव कोरडे, प्रमुख अतिथी म्हणून न.प. अध्यक्ष रत्नमालाताई भोयर, तथा मूलचे  कुणबी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाला उपस्थितीताना जेवनाची सोय  संदीप झरकर  व डेकोरेशनची  जवाबदारी श्री संतोष घोगरे यांनी विनामूल्य पार पडली तसेच  कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मारोती शेरकी, संतोष चिताडे, प्रशांत बोबाटे, वैभव तांगडे, अरुण चौकुंडे, विलास घोगरे, संतोष घोगरे, धनराज शेरकी इत्यादींनी प्रयत्न केले. सूत्र संचालन चेतना चौकुंडे तर आभार वैष्णवी कोरडे यांनी केले. अखिल भारतीय कुणबी समाज संघटना शाखा मूल यांनी कार्यक्रमाची सम्पूर्ण जबाबदारी पार पडली.