36
बंद झालेल्या बसेस सुरू करा
मूल :- चंद्रपुर शहर शैक्षणिक दृष्ट्या आणि रोजगाराच्या दृष्टीने ठळक स्थान असुन जिल्हयातील मोठे बाजारपेठ आहे. तसेच रुग्नालय व इतर शासकीय व खाजगी कामाकरीता दररोज मोठया प्रमाणात प्रवासी गडचिरोली,व्याहाड, सावली, मुल वरून प्रवास करतात.या सर्व कामाच्या दृष्टीकोनानुसार प्रवासाना रात्री ८.३० ला व ९.१५ वा. चंद्रपुर तेगडचिरोली बस प्रवाशांना खुप मोलाची व सोयीस्कर होती. जे कोरोनाच्या काळात बंद करण्यातआलेली होती.  चंद्रपुर वरून रात्री ८.३० ला व ९.१५ वा ची बस पुर्ववत अतिशिघ्र तातडीने निर्णय
घेवून चालु करण्यात यावी.अशी मागणी करण्यात येत आहे. याबाबत  अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेने विभागीय नियंत्रक
रा.पं.म.गडचिरोली यांना निवेदन दिले.
यावेळी समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्रा.विजय लोनबले ,
जिल्हा सहसचिव तौसिफ सय्यद, जिल्हा सल्लागार युवराज चावरे ,विद्यार्थी व प्रवासी मोठया संख्येने उपस्थित होते.