वीट भटयांच्या रोजगारामुळे अनेक कुटुंबे आत्मनिर्भरतेकडे

45

वीट भटयांच्या रोजगारामुळे अनेक कुटुंबे आत्मनिर्भरतेकडे
मूल (प्रमोद मशाखेत्री ):- एकूण 108 गावांचा समावेश असलेल्या मुल तालुक्यात 10 गावांमध्ये प्रत्येक गावालगत दोन चार वीट भटया सुरू
असल्याचे चित्र आहे. या व्यवसायामुळे तालुक्यातील गावे आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करताना दिसत आहेत. काही गावांमध्ये निम्मे कुटुंब फक्त विटा बनविण्याचाउद्योगात गुंतलेले दिसत आहेत. या माध्यमातून त्या गावांमधील मजुरांना गावातच रोजगार प्राप्त करण्याची संधी प्राप्त होत आहे.2022 पर्यंत प्रत्येक कुटुंबाला पक्के घर आणि प्रत्येक घरी वीज व पाण्याची मूलभूत सोय व्हावी यासाठी केंद्र शासन सतत प्रयत्नशील असून दारिद्रयरेषेखालील प्रत्येक गरजू कुटुंबाना प्रधानमंत्री आवास येाजना व राज्य शासनाच्या इतर योजनेतून घरकुल देण्याचे काम वेगाने सुरू आहे.येणा-या काळात एपीएल असो कि बीपीएल असो प्रत्येक कुटुंबाकडे पक्के घर असणार आहे.पक्के घर म्हटले की पक्के विटा आणि सिमेंटनी तोडलेला बांधकाम अर्थात पक्के घर निर्मित करताना महत्वाचा घटक म्हणजे विटा आणि विटांची गरज प्रत्येक  बांधकामाला लागणारअसल्याने विटांची मागणी वाढत आहे.

अशात विटा निर्मितीचे उद्योग चालविणारे व्यावसायीक याची वेळेवर पूर्तत: करू शकत नाही.
शासनाकडून घरकुलासाठी मिळणारा निधी दीड लाख रूपयांपर्यंत असून संपूर्ण घराची निर्मिती करण्यासाठी रक्कम कमी पडते.
अशात अनेक कुटुंबे आपल्या स्वतःच्या परिश्रमाने विटा निर्मिती करून आपल्या घराचे बांधकाम करण्याचा पुढाकार घेऊन आत्मनिर्भर
होऊन कार्य करीत आहेत. अनेक कुटूुबानी तर गरज पूर्ण करून बचत करण्याचा मार्गसुध्दा शोधला.
एखाद्या कुटुंबाला 30 हजार विटांची गरज असेल तर तो एकुण 50 हजार विटांची भटी तयार करतो. त्यातून 20 हजार विटांची विक्री करून त्या रकमेतून इतर आवश्यक वस्तूची खरेदी करतो व शासनाकडून मिळालेल्या निधीचा योग्य सदुपयोग करून आपल्या पसंतीच्या सोयीनुसार घर तयार करतो. प्रत्येक कुटुंबीय वाढीव स्वरूपात विटा व इतर साहित्याचा वापर करून देान पेक्षा अधिक खोल्याचे घर तयार करीत आहे.