शिष्यवृत्ती अर्जासाठी महाडीबीटी पोर्टल वर  अंतीम तारीख 31 मार्च 2021

52

शिष्यवृत्ती अर्जासाठी महाडीबीटी पोर्टल वर  अंतीम तारीख 31 मार्च 2021

मूल:- सामाजिक न्याय व विशेष सहाय विभागामार्फत प्रत्येक वर्षी अनुसूचित जाती,विमुक्त जाती,भटक्या
जमाती,इतर मागसवर्ग व विशेष् मागास प्रवर्गातील मॅट्रिकोत्तर शिक्षण घेत असलेल्या विद्याथ्र्यांना भारत सरकार शिष्यवृत्ती व शिक्षण शुल्क,परीक्षा शुल्क योजनांचा
लाभ देण्यात येतो. या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्याथ्र्यांस विभागाच्या पोर्टलवरून आॅनलाईन अर्ज भरणे आवश्यक आहे.
सन 2020-21 या वर्षाकरीता प्रवेशित सर्व मागासवर्गीय विद्याथ्र्यांनी आॅनलाईन अर्ज भरण्यासाठी अंतीम तारीख 31 मार्च 2021 महाडिबीटी प्रणाली कार्यान्वित करण्यात आलेली आहे. या प्रणालीचा वापर करून संबंधित विद्याथ्र्यांनी लाभ घ्यावा.


लागणारे कागदपत्रे:- आधार कार्ड, अधिवास प्रमाणपत्र,जातीचे प्रमाणपत्र,नाॅनक्रिमीलेअर,मिळकतीचे प्रमाणपत्र (इंकम),संपूर्ण मार्कसिट,टिसी,अपत्य संबधी प्रमाणपत्र,रेशनकार्ड,अॅडमिशन पावती,गॅप सटीफिकेट,बॅंक पासबूक

अधिक माहितीसाठी महाडिबीटी संकेतस्थळावर भेट दयावी.