कोमेजलेल्या झाडांना नगराध्यक्षांनी पाणी घातले

27

कोमेजलेल्या झाडांना नगराध्यक्षांनी पाणी घातले

सुदृढ आरोग्यासाठी पर्यावरण आणि पर्यावरणा करीता वृक्षारोपण आहे महत्वाचे

मूल :-  सुदृढ आरोग्यासाठी पर्यावरण आणि पर्यावरणा करीता वृक्षारोपण महत्वाचे आहे. म्हणून अनेक संस्था वृक्षारोपणाचे विधायक उपक्रम राबवित असते. परंतू वृक्षारोपण करून जबाबदारी पुर्ण होत नाही तर वृक्षारोपणा नंतर रोपण केलेल्या वृक्षाचे संगोपन आणि संवर्धनही तेवढेच महत्वाचे आहे. परंतू अनेक संस्था याकडे दुर्लक्ष करीत असल्याने अनेक ठिकाणी वृक्षारोपणाचा बोझवारा वाजत आहे. असेच काहीसे चित्र मूल शहरातही निर्माण झाले आहे. स्वच्छ आणि सुंदर शहर या अभियाना अंतर्गत नगर परिषदेच्या वतीने मूल शहरातील गुजरी चौक सुंदर आणि नियोजनबध्द दिसावा म्हणून मोठमोठया कुंडयामध्यें दिड ते दोन फुट उंचीच्या आकर्षक वृक्षाचे रोपण केले.

 

कुंडयामध्यें वृक्षारोपण केल्यानंतर त्या वृक्षांना नियमित पाणी टाकणे गरजेचे आहे. परंतु मागील काही दिवसांपासुन गुजरी चौकातील कुंडयामध्यें रोपण केलेल्या वृक्षांना पाणी दिल्या जात नसल्याने कुंडयामधील सर्व झाड सुकायला आणि कोमेजली होती. हजारो रूपये खर्चून लावलेल्या वृक्षांची गंभीर परिस्थिती बघुन एका सदगृहस्थाने नगराध्यक्षा रत्नमाला भोयर यांना परिस्थिती अवगत करून दिली. लावलेल्या झाडांकडे नगर प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे लक्षात येताच

नगराध्यक्षा रत्नमाला भोयर स्वतःच्या चारचाकी वाहणाने गुजरी चौकात पोहोचल्या. स्वतःच्या वाहणामध्यें पाच ते सहा पिप्यामध्यें भरून आणलेले पाणी कुंडयामधील झाडांना घालून कोमेजलेल्या वृक्षांना सतेज करण्याचा प्रयत्न केला. यापुढेही कुंडयामधील झाडांकडे नगर प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्यास नगराध्यक्ष या जबाबदारीने आपण स्वतः पाणी घालू किंवा त्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करू. असा निर्णय सुध्दा जाहीर केला. नगराध्यक्ष भोयर यांनी वृक्षाविषयी दाखविलेला हा सतर्कपणा प्रत्यक्षदर्शीना समाधान आणि अभिनंदनीय वाटला. नगर प्रशासनाने वृक्षारोपण केले असेल तर त्याच्या संवर्धनाची जबाबदारी सुध्दा ही नगर प्रशासनाचीच आहे. त्यामूळे नगर प्रशासनातील संबंधीताने या बाबीकडे लक्ष दयायला पाहिजे होते. परंतू अनावधानाने तसे झाले नसेल तर यापुढे ज्या ठिकाणी वृक्षारोपण करण्यांत आले त्या ठिकाणातील वृक्षाच्या संवर्धनाकरीता लक्ष द्यावे. असे सक्त आदेश देणार असल्याचे नगराध्यक्ष भोयर यांनी प्रतिनिधीशी बोलतांना सांगीतले.