सहकारी सामुदायिक शेती संस्थेला दिलेली सरकारी खाली जागा रद्द करा – ताडाळा वासीयांची मागणी

30

सहकारी सामुदायिक शेती संस्थेला दिलेली सरकारी खाली जागा रद्द करा – ताडाळा वासीयांची मागणी

मूल :- तालुक्यातील मौजा ताडाळा तुकुम येथील सहकारी सामुदायीक शेती संस्था चिचाळा यांना दिलेली सरकारी खुली जागा रद् करण्याची मागणी ताडाळा येथील गावक-यांनी केली आहे या मागणीसाठी त्यांनी मुल चे तहसिलदार डाॅ. रविंन्द्र होळी यांना एक निवेदन देवून न्याय देण्याची मागणी केली आहे.
मौजा ताडाळा तुकुूम येथे सहकारी सामुदायीक शेती संस्था चिचाळा यांना भुमापन क्रमांक 300 मध्ये 63 पाईन्ट 64 हेक्टर जागा शासनाने दिली.परंतू सदर जागा संस्थेला हस्तांतरण करतांना ग्रामपंचायत ने कोणतीही जाहीरनामा प्रसिध्द केलेला नाही. तसेच सदर जागेविषयी गावक-यांना सुध्दा माहिती दिली नाही. या जागेत संस्थेचे 33 सभासद जागेचा वापर करून उत्पन्न घेत आहेत.
त्यांना या बाबत अंदाजे 24 हेक्टर जागेचा पटा मिळालेला आहे. उर्वरीत काही जागा संस्थेचे इतर सभासद जागेचा पटा मिळावा म्हणून त्यांचा वापर करायला सुरूवात केलेली आहे. या विषयी गावक-यांनी आक्षेप घेतलेला आहे. उर्वरीत जागेचा वापर केला जात असद्यल्याने गावक-यांना मोठी अद्यडचण निर्माण झालेली आहे.जागेवर मातीकाम करतांना तलावाचे पाणी जाण्याचा कालवा बंद करून निबोंळी तलाव व फुटका तालवात अतिक्रमण केलेले आहे. यामुळे तलावाच्या मागील शेतकद्य-यांना शेतीचे उत्पन्न घेतांना पुरेशे पाणी उपल्बध होणार नाही. तसेच शेतक-यांचे आर्थीक नुकसान होईल अशी भीती गावकद्य-यांनी व्यक्त केली आहे.
त्यामुळे संस्थेला मिळलेली उर्वरीत जागा गावक-यांच्या हिताची असून ति जागा ग्रामपंचायत ताडाळा यांना हस्तातरीत करावी अशी मागणी गावक-यांनी केली आहे याबाबत नुकतेच ताडाळा येथील नंदुभाउ रणदिवे,राजेंन्द्र कन्नमवार,राहूल मुरकुठे,इश्वर लोनबले,शिलाताई दहीवले  ,प्रभाकर शेन्डे ,राजु मुरकूटे, नितेश दहीवले, विनोद कोमलवार, संतोष गंगुलवार, प्रविन तेलावार, संदिप कन्नमवार,अनुप कागदेलवार, विजय कागदेलवार ,मनोज मुत्यलवार ,नेताजी वाढई यांच्या सह 150 गावकद्य-यांनी तहसिलदार मूल यांना निवेदन देण्यात आले.