मूल तालुक्यात 5 ते 8 च्या 68  शाळा झाल्या सुरु    विध्यार्थी वर्गात दिसुन आला उत्साह 

32

 

महाराष्ट्र शासनाने कोविडच्या प्रभावाने गेल्या  मार्च 2020 पासुन शाळा बंद करण्यात आल्या होत्या.यापूर्वी इयत्ता 9 वी ते 10 वी चे वर्ग सुरु करण्यात आले.याला विद्यार्थ्याचा उत्तम प्रतिसाद मिळाला.तसेच कोरोनचा प्रादुर्भाव जाणवला नसल्याने शासनाने 27 तारखेपासून इयत्ता 5 वी ते 8वी पर्यंतचे वर्ग सुरु करण्याचा निर्णय घेतला.मूल तालुक्यात  68 शाळा असुन सर्वच शाळा सुरू झाल्या आहेत.पहिल्याच दिवशी विद्यार्थी वर्गाचा उत्तम प्रतिसाद मिळाला.येथील गटशिक्षणाधिकारी वैभव खांडरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख,विषयतन्ध्य   यांचे  शाळा भेट नियोजन करुन शाळेला भेट देण्यात आली.यावेळी शासनाने ठरवुन दिलेल्या नियम व अटी तपासण्यात आल्या.विध्यार्थी वर्गात शाळा सुरु झाल्याचा उत्साह  दिसुन आला असल्याचे दिसून आले. वर्ग 5 ते 8 चे वर्ग सुरळीतपणे सुरु झाले तर शासन इयत्ता 1ली ते 4 थी पर्यतचे वर्ग सुरु करण्याचे सूतोवाच दिले आहे,विशेष!