मूल :- कोविड -19 च्या प्रकोपामुळे देशात सर्वत्र शाळा बंद असल्याने त्यांना गणराज्य दिनानिमित्त ध्वजारोहण करता आले नाही म्हणून मूल येथील वार्ड क्रमांक 14 मधील रहिवासी कुमारी अनघा सुनील कांमडी वर्ग 3 री, कु. सान्वी हेमंत कन्नाके वर्ग 4 थी, संस्कार जितेंद्र बल्की वर्ग 3 री, झोया शेख वर्ग 5 वी, शिवांश दीपक मडावी वर्ग 2 री, सर्व विद्यार्थी सेन्ट एनेस कान्वेंट मूल, तर बल्लारपूर येथील कु. आराध्या गुंडेवार वर्ग 3 री या चिमुकल्यांनी वॉर्डांमध्ये रोडच्या कडेला एका काडीला तिरंगा राष्ट्रध्वज लावला राष्ट्रध्वजाला सलामी देण्यात आली त्यानंतर राष्ट्रगीत गाऊन गणराज्य दिन साजरा केला.घरी राहून कंटाळा आला, विद्यार्थ्यांना शाळेत जायला मिळत नसून, राष्ट्रीय उत्सवात, सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग घेता येत नसल्याची खंत या चिमुकल्यांनी व्यक्त केली. मसदर चिमुकल्या शाळकरी विद्यार्थ्यांनी दिलेला देशभक्तीचा हा संदेश भविष्यातील युवापिढीने अंगीकारणे देश हिताचे ठरेल, येथील वार्ड क्रमांक 14 मधील राहणाऱ्या या छोट्या देशभक्तांचे सर्वत्र कौतुक केल्या जात आहे.