वैद्यकीय अधिक्षक डॉ.उज्वल इंदुरकर यानी घेतली कोविडची पहिली लस 

46

वैद्यकीय अधिक्षक डॉ.उज्वल इंदुरकर

यानी घेतली कोविडची पहिली लस

मूल :-      संपुर्ण देशात हाहाकार माजविणार्या कोरोनाने आनेकांना आपल्या कवेत घेऊन त्याला मृत्युच्या दाढेत ओढुन घेतले.2020 हे वर्ष सर्वाना भितीदायक ठरले होते.कोरोनची लस जानेवारी महिन्यात येईल असा अंदाज वर्तविला जात होता.हा अंदाज खरा ठरला असुन मूल येथे ही लस पोहचली.या लसीचे पहिले मानकरी ठरले मूल येथील उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकिय अधिक्षक डॉ.उज्वल इंदुरकर. मूल येथे कोविड लस आल्यानंतर त्या लसीविषयी गैरसमज दुर व्हावा व जनतेत लसी विषयी विश्वास निर्माण होण्यासाठी डॉ.इंदुरकर यानी लस घेतली.

 

 

यावेळी मूल नगर परिषदेच्या नगराध्यक्षा रत्नमाला भोयर, उपाध्यक्ष  नंदकिशोर रणदिवे,पोलीस  उपविभागीय अधिकारी अनुज तारे, तालुका वैधकीय अधिकारी डॉ. सुमेध खोब्रागडे, भाजप शहराध्यक्ष प्रभाकर भोयर, सामाजिक कार्यकर्ते किशोर कापगते तसेच संपूर्ण वैधकीय चमू उपस्थित होती.