मंगेश पोटवार यांनी वेधले प्रशासनासोबतचं जनतेचे लक्ष

59

मूल
मराठा आरक्षणा सोबतच राज्यात आज ओबीसी चळवळ चांगलीच फोफावात आहे. ओबीसी समाजाची जनगणना करण्यात यावी. अशी मागणी जोर धरत असताना प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधुन ओबीसी चळवळीचे खंदे कार्यकर्ते मंगेश पोटवार यांनी ओबीसी समाजाच्या जनगणनेची मागणी आगळ्या वेगळ्या पध्दतीने व्यक्त केली. समाजाच्या मागणीकडे शासनकर्त्याचे लक्ष वेधावे म्हणुन मंगेश पोटवार यांनी परीधान केलेल्या राष्ट्रीय पोषाखावर ओबीसी समाजाची जनगणना झालीच पाहीजे असे फलक लावुन विविध ठिकाणी पार पडलेल्या ध्वजारोहण कार्यक्रमात सहभागी झाले. त्यामुळे अंगावर मागणीचे फलक लावुन अभिनव पध्दतीने गर्दीत उभे राहणारे मंगेश पोटवार आज चांगलेच चर्चेत राहीले. ओबीसी समाजातील अनेकांनी मंगेश पोटवार यांच्या या अभिनव उपक्रमाचे स्वागत केले असले तरी पोलीस प्रशासनाने माञ त्यांना या अभिनव उपक्रमाविषयी नोटीस दिली. हे विशेष.